कलम ३७० हटवल्याने काश्मीरमध्ये विकासाच्या नव्या आशा पल्लवित : पं. मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2019
Total Views |


modi_1  H x W:


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे झालेल्या एका शिखर परिषदेत सांगितले की, "कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या कठीण वाटू शकतो. परंतु या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील जनतेत विकासाची नवी आशा निर्माण झाली आहे. ते म्हणाले की,"निवडणुका येताच आत्तापर्यंत रेल्वे व शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईच्या घोषणा होत. पण आम्ही देशाला आश्वासनांच्या राजकारणाऐवजी विकासाच्या राजकारणाकडे नेत आहोत.



ते म्हणाले की
," आम्ही पान सोडणाऱ्यांमधील नाही तर नवीन अध्याय लिहिणाऱ्यांमध्ये आहे. आम्ही असे लोक आहोत जे देशाच्या सामर्थ्यावर, संसाधनांवर आणि देशाच्या स्वप्नांवर विश्वास ठेऊन आहोत. आम्ही देशातील उपलब्ध स्त्रोतांचा संपूर्ण देशभक्ती आणि प्रामाणिकपणाने आपल्या देशाच्या चांगल्या भवितव्यासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारत आपल्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आत्मविश्वासाने कार्य करीत आहे. हे लक्ष्य अर्थव्यवस्थेशी तसेच १३०९ कोटी भारतीयांच्या 'इज ऑफ लिव्हिंग' आणि त्यांचे उद्याचे उद्याचे सरासरी उत्पन्न यांच्याशी जोडलेले आहे."




नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकाचा संदर्भ देताना मोदी म्हणाले की
, "आपल्या देशात अत्याचार सहन करत असणाऱ्या भारतीयाना भारतीय नागरिकत्व दिल्यास त्यांचे भविष्य चांगले होईल. ते म्हणाले की, शेजारच्या देशांमध्ये छळ झालेल्या पीडितांना भारतीय नागरिकत्व दिल्यास त्याचा फायदा त्यांना नक्की होईल.

 



पुढे मोदी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात म्हटले आहे की
, “शेजारच्या देशांतील शेकडो कुटुंबे ज्यांचा भारतावर विश्वास आहे, अशांसाठी जेव्हा त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याचे मार्ग उघडे होतील, तेव्हा त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल.केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नागरिकता दुरुस्ती विधेयकास मंजुरी दिली.

@@AUTHORINFO_V1@@