संसदेच्या कँटीनची सबसिडी बंद ; खासदारांचे जेवण महागणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2019
Total Views |


subsidy_1  H x


नवी दिल्ली : संसदेच्या कॅन्टीनमधील जेवणावरील सबसिडी पूर्णपणे बंद होणार आहे. सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या किमती आता उत्पादन खर्चाप्रमाणे ठरवण्यात येतील. मागील लोकसभेच्या कॅन्टीनमध्ये पदार्थांच्या किमती वाढवून सबसिडीचे बिल कमी करण्यात आले होते. मात्र आता अजिबात सबसिडी लावली जाणार नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांनी हा एकमताने निर्णय घेतला आणि लोकसभा अध्यक्षांनी हा निर्णय जाहीर केला. आत्तापर्यंत संसदेच्या खानपानाचे वार्षिक बिल सतरा कोटींपर्यंत येत होते.



मात्र आता संसदेच्या कॅन्टीनमधील अनुदान पूर्णपणे थांबवले जाईल. व्यवसाय सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी अनुदानावर १७ कोटी रुपये खर्च केले जातात. यासंदर्भात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले की
, "संसदेच्या कॅन्टीनवर दिले जाणारे अनुदान तातडीने आज ५ डिसेंबर २०१९ पासून रद्द केले गेले आहे. व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध पक्षातील खासदारांनी हे अनुदान बंद करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे."

@@AUTHORINFO_V1@@