नीरव मोदी फरार आर्थिक गुन्हेगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरा व्यावसायिक नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. ईडीने मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केलेला अर्ज स्वीकारला आहे. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असून सुमारे १३,००० कोटींच्या पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यामध्ये फरार आहे. एफईओ कायद्यानुसार आर्थिक गुन्हेगार घोषित झाल्यानंतर त्याच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी कारवाई केली जाऊ शकते.

 

यापूर्वी, विशेष न्यायालयाने नीरव मोदीला वारंवार कोर्टात हजर राहण्याचे आदेश बजावले होते. मात्र, त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर, नीरव मोदीला आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात यावे, अशी याचिका इडीकडून न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. त्यासाठी त्याच्या संदर्भातील सर्व पुरावे ईडीकडून न्यायालयात सादर करण्यात आले होते. यानंतर झालेल्या सुनावणीमध्ये गुरुवारी विशेष न्यायालयाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. आता नीरव मोदीची संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@