चिदंबरम यांच्याकडून न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2019
Total Views |


javdekar_1  H x



नवी दिल्ली
: ‘आयएनएक्स मीडिया’ गैरव्यवहारप्रकरणी नुकतेच तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी सडकून टीका केली. जामीन मिळाल्याच्या पहिल्याच दिवशी चिदंबरम यांनी न्यायालयाने घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला.


ते म्हणाले
, “न्यायालयासमोर असलेल्या प्रकरणावर बोलू नका, असा न्यायालयाचा स्पष्ट निर्देश असतानाही चिदंबरम हे स्वत:च स्वत:ला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यापूर्वी चिदंबरम यांनी आपल्या कार्यकाळात काय परिस्थिती होती, ते आठवायला हवे,” असे जावडेकर यावेळी म्हणाले.


चिदंबरम यांच्या जामीन प्रकरणावर बोलताना ते म्हणाले
, “न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांविषयी कोणत्याही प्रकारची टिप्पणी करू नका, अशी अट सर्वोच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करताना घालून दिली होती. मात्र, चिदंबरम यांनी पहिल्याच दिवशी त्या अटीचे उल्लंघन केले आहे. त्यांनी पत्रकारपरिषदेत आपली मंत्रिपदाची कारकिर्द अतिशय स्वच्छ होती, असे विधान केले आहे. मात्र, मंत्रिपदावर असताना आपले कर्तव्य पार पाडताना त्यांनी भ्रष्टाचार केला, हाच आरोप चिदंबरम यांच्यावर आहे आणि त्याविरोधातच खटला सुरू आहे. मात्र, चिदंबरम यांचे आजचे वक्तव्य पाहता चिदंबरम हे स्वत:च स्वत:ला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देत आहेत, असे जावडेकर म्हणाले.



चिदंबरम यांनी काश्मीरवर केलेल्या वक्तव्याचा समाचार जावडेकर यांनी घेतला
. ते म्हणाले की, “चिदंबरम सत्तेत असतानाचा काळ त्यांनी आठवून पाहावा. त्यांच्या काळात काश्मीर जळत होते. काश्मीरमध्ये हिंसाचाराने कळस गाठला होता. त्या तुलनेत आज काश्मीर अतिशय शांत असून विकासाच्या मार्गावर काश्मीरची वाटचाल सुरू आहे. काश्मीरमध्ये वृत्तपत्रांचे प्रकाशन आणि वृत्तवाहिन्यांचे प्रसारण नियमितपणे होत आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य नाही, हा चिदंबरम यांचा दावा असत्य आहे. देशात १९७५साली प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लादण्यात आली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य नव्हते, असा टोलाही जावडेकर यांनी लगावला. “अर्थव्यवस्थेवर बोलण्यापूर्वीही चिदंबरम यांनी त्यांचा कार्यकाळ आठवावा. गेल्या पाच वर्षांत महागाईचा दर केवळ चार टक्के राहिला आहे. चिदंबरम यांच्या कार्यकाळात महागाईचा उच्च दर आणि किरकोळ आर्थिक वृद्धी दर अशी अर्थव्यवस्थेची वाटचाल होती,” असेही जावडेकर यांनी सांगितले.


चिदंबरम यांचा कांगावा...

आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकऱणी १०५ दिवसांच्या तुरूंगवासानंतर जामीनावर बाहेर आलेल्या पी. चिदंबरम यांनी पत्रकारपरिषद घेत कांगावा केला. आपणास कोणत्याही आरोपाविना तुरुंगात टाकण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे काश्मिर खोर्‍यातील जनतेला आपल्या मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे, मला त्यांची काळजी वाटते. देशातील अर्थव्यवस्था आणि घसरता जीडीपी आदींविषयी सरकार पुरेसे गंभिर नसल्याचेही चिदंबरम यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.



मग नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री का झालात
?

१९८४ साली झालेल्या दंगलीदरम्यान जर तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांनी सैन्यास पाचारण केलवे असते तर हिंसा टळली असती, असे विधान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन यांनी नुकतेच केले. त्यावर जावडेकर म्हणाले की, “असे होते तर नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग का सहभागी झाले होते, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे. सैन्य पाचारण करण्याचा अधिकार पंतप्रधानांना असतो. तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी तर मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा पृथ्वी हलते, असे विधान करून नरसंहाराचे समर्थन केले होते.”

@@AUTHORINFO_V1@@