४०० शिवसेना कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


मुंबई : राज्यामध्ये सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेल्या हातमिळवणी करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे नाराज झालेल्या ४०० शिवसेनेच्या कामगारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बुधवारी धारावी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी हा प्रवेश केला. "शिवसेनेने भ्रष्ट आणि हिंदू विरोधी असलेल्या पक्षांशी हात मिळवणी करणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेतल्यासारखे आपल्याला वाटत आहे ." असे मत भाजपत प्रवेश केलेले रमेश नाडार यांनी सांगितले.

 

महाराष्ट्रामध्ये शिवेसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. महिनाभर राज्यात सत्ता नाट्य सुरू होते. या काळात भाजप आणि शिवसेनेची युती मुख्यमंत्रीपदावरुन तुटली आणि शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करावी लागली. आता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही शिवसैनिक यामुळे नाराज होते. त्यामुळेच या ४०० कामगारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@