वाडिया रुग्णालय बंद करण्याचा घाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019
Total Views |

nana_1  H x W:



मुंबई : लहान मुलांसाठी प्रसिद्ध असलेले परळ येथील वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी बंद करण्याचा घाट घातला जात आहे. वाडिया व पालिका यांच्या वादात मागील तीन महिन्यांचे ९८ कोटींचे अनुदान थकल्यामुळे रुग्णालयाच्या सेवा-सुविधांवर ताण येत असल्याचा आरोप बुधवारी स्थायी समितीत नगरसेवकांनी केला. तीन महिन्यांचा थकलेला निधी पालिकेने तत्काळ द्यावा, अशी मागणी करीत रुग्णालय बंद पाडण्याचा घाट हाणून पाडला.

 

वाडिया रुग्णालय हे लहान मुलांसाठी प्रसिद्ध आहे. या रुग्णालयाची ४० टक्के जागा पालिकेची असून रुग्णालय चालवण्यासाठी पालिकेकडून अनुदान दिले जाते. मात्र, जागा व निधी पालिकेकडून दिली जात असतानाही रुग्णालय खासगी पद्धतीनेच चालवले जाते. निधी देऊनही रुग्णांना तशा प्रकारे सेवा मिळत मिळत नाहीत. त्यामुळे हे रुग्णालय पालिकेला चालवण्यासाठी द्यावे, असे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका व वाडिया यांच्या वादात पालिकेकडून दिला जाणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून थकलेले आहे.

 

निधी अभावी रुग्णालयाच्या सेवा-सुविधांवर ताण येत असल्याने यापुढे रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही. शिवाय जे रुग्ण दाखल आहेत, त्यांना डिस्चार्ज देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. विरोधी पक्ष रवी राजा यांनी बुधवारी स्थायी समितीत याबाबतचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. पालिका-वाडिया रुग्णालयाच्या वादात लहान मुलांसाठी एकमेव असलेले हे रुग्णालय निधीअभावी बंद करण्याचा घाट घातला जातो आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला.

@@AUTHORINFO_V1@@