पुन्हा किंग कोहली नंबर १ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत विराट कोहलीने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. ९२८ गुणांसह विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे तर ९२३ पॉईंटसह ऑस्ट्रेलियाचा स्मिथ दुसऱ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन ८७७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

 
 
 

भारताचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. आयसीसी क्रमवारीत भारताच्या तीन फलंदाजांना स्थान पटकावण्यात यश मिळाले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये रवींद्र जाडेजा दुसऱ्या आणि आर अश्विन पाचव्या क्रमांकावर आहेत. तसेच, भारताचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारताच्या खात्यामध्ये ३६० गुण जमा आहेत.

@@AUTHORINFO_V1@@