देशभरातील राज्य विद्यापीठांचे संवर्धन व्हावे – अभाविप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019
Total Views |
abvp_1  H x W:



दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६५ वे राष्ट्रीय अधिवेशन राज्यातील विद्यापीठांची व्यवस्था सुधारणे, सरकारी शाळांमध्ये शिक्षण आकर्षक बनवण्यासाठी 'School Bell अभियान' देशभर चालवणे, रोजगार व आर्थिक विषयांवर परीचर्चांचे आयोजन करणे, देशभरात NRC लागू होण्यासाठी जनजागरण करणे व जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शंभराव्या वर्षपूर्तीला हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या हुतात्म्यांचा सन्मानासाठी कार्यक्रम आयोजित करणे अशा सर्व महत्वपूर्ण निर्णयांसोबत २२-२५ नोव्हेंबर २०१९ रोजी आग्रा येथे संपन्न झाले.

राष्ट्रीय अधिवेशनात वर्ष २०१९-२० च्या नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या राष्ट्रीय अधिवेशनात नवीन संघटनात्मक जबादारी निश्चित झाल्या ज्यात प्रामुख्याने राष्ट्रीय संघठनमंत्र्यांचे दायित्वाच्या निर्वहनासाठी श्री. आशिष चौहान यांची निवड आली. तर २०१९-२० साठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून डॉ. एस. सुबैय्या व राष्ट्रीय महामंत्री म्हणून निधी त्रिपाठी यांची घोषणा करण्यात आली. तसेच मुंबईचे कार्यकर्ते व कोकण प्रदेश मंत्री श्री.अनिकेत ओव्हाळ यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून घोषणा झाली.

अधिवेशनात विद्यार्थी हित समाजहित व राष्ट्रहित या गोष्टी लक्षात ठेवून राज्यातील विद्यापीठाचे संवर्धनाची नितांत गरज, राष्ट्रीय परिदृश्य, जम्मू व कश्मीर मधून कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर व लद्दाखमधील नवीन सामाजिक परिस्थितीचा उदय, राम मंदिर निर्माणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अभिनंदन असे चार प्रस्ताव पारित करण्यात आले.

विद्यार्थी परिषद आगामी दिवसात रचनात्मक व आंदोलनात्मक कार्य करेल, असे विद्यार्थी परिषदेच्या नवनिर्वाचित राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितले. दत्तोपंत ठेंगडीजींच्या १०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पूर्ण देशभरात विद्यार्थी परिषद वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करेल. विद्यापीठामध्ये असणाऱ्या समस्यांवर संपूर्ण देशभरात आंदोलन करण्यात येईल. तसेच जालियनवालाबाग हत्याकांड च्या १०० व्या वर्षपूर्ती ला संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

बेंगळुरूमध्ये महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने School Bell अभियानाच्या माध्यमाने १५० सरकारी शाळांना दत्तक घेण्यात येईल, ज्यामध्ये ५००० कार्यकर्ते ३ दिवस सदर शाळांमध्ये श्रमदान करतील.

‘जीरो फूड वेस्ट’ या मोहिमे अंतर्गत जेवणात एक ही कण वाया जाणार नाही याची खात्री अधिवेशनात घेण्यात आली होती. तसेच अधिवेशन परिसरात स्वछतेचीही काळजी घेण्यात आली होती. राष्ट्रासाठी समर्पित वीरांच्या जीवनावर एक भव्य अशी प्रदर्शनी बनवण्यात आली होती. जालियनवाला बाग हत्याकांड याचे दृश्य दाखवणारे एक स्मारक उभारण्यात आले होते, ज्यामध्ये पंजाब प्रांताच्या कार्यकर्त्यांनी आणलेली जालियनवाला बागेची माती ठेण्यात आली होती. आणि ती माती देशभरातील ४० राज्यात पाठवण्यात आली. गुरुनानक देव यांच्या ५५० व्या प्रकाशवर्ष, गांधीजीची १५० वी जयंती, वीर अभिनंदन, चांद्रयान २ अशा विषयांवर सेल्फी पॉइंट बनवण्यात आले होते.

अधिवेशनात प्रसिद्ध पुरातत्वविद वसंत शिंदे यांनी राखी गडीच्या शोधात मिळालेल्या अवशेषांवर विचार मांडले. आर्थिक स्थितीच्या विषयात JNU प्राध्यापक संतोष मल्होत्रा आणि RBI चे निर्देशक सतीश मराठे यांनी विचार मांडले. तसेच महिला विमर्श आणि युवा याविषयांवर अखिल भारतीय विद्यार्थिनी प्रमुख ममताजी त्रिपाठी यांनी विचार मांडले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींच्या उपस्थितीमध्ये अनाथ मुलांकरिता विशिष्ठ कार्य कारणाऱ्या नवी मुंबईच्या सागर रेड्डी यांना प्राध्यापक यशवंत राव केळकर युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अधिवेशनात सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. ज्या मध्ये ब्रज प्रांताच्या संस्कृतींचे दर्शन सर्व कार्यकर्त्यांना झाले. तसेच केंद्रीय हिंदी संस्थानाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन गीत आणि नृत्याचा मार्फत केले.

या पत्रकार परिषदेत कोकण प्रदेशमंत्री तसेच नवनिर्वाचित राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य स्वाती चौधरी, मुंबई महानगर सहमंत्री विट्ठल परब उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@