न्यूझीलंडच्या संघाला मिळाले कर्माचे फळ ; दिला 'हा' पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाला २०१९ चा 'क्रिस्तोफर मार्टिन-जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट' पुरस्कार देण्यात आला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या न्यूझीलंड संघाला विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दर्शविलेल्या क्रीडा भावना, क्रीडा कौशल्य, आणि नम्रतेसाठी ही पुरस्कार देण्यात आला आहे. क्रिकेट विश्वात या पुरस्काराला महत्व आहे.

 

एमसीसी आणि बीबीसी यांनी २०१३ मध्ये हा क्रीडा पुरस्कार देण्यास सुरूवात केली. एमसीसीचे माजी अध्यक्ष आणि बीसीसीच्या कसोटी सामन्याचे समालोचक क्रिस्टोफर मार्टिन-जेन्किन्स यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता. अतिशय थरारक आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लडने न्यूझीलंडचा पराभव केला आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकवर नाव कोरले. इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर किवी न्यूझीलंडने खेळाच्या भावनेचे सुंदरतेने प्रदर्शन केले होते, ज्याचे जगभरात खूप कौतुक झाले.

@@AUTHORINFO_V1@@