पोळ्यांची किंमत कोट्यवधींमध्ये !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019
Total Views |

jph _1  H x W:

 


मुंबई : शीव रुग्णालयात पोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी नवीन कंत्राट देण्यात येत असून त्यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पालिकेच्या शीव रुग्णालयातील १५०० आंतररुग्णांना मोफत जेवण दिले जाते. यामध्ये प्रत्येक रुग्णास दररोज चार पोळ्या देण्यात येतात. पोळ्या पुरवठादाराचे कंत्राट संपुष्टात आल्याने आता नवीन कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांमध्ये शीव रुग्णालयात दररोज सहा हजारप्रमाणे ६५ लाख, ६७ हजार पोळ्यांचा पुरवठा केला जाणार आहे. सदर कंत्राटदारास पालिका तब्बल १ कोटी, ७५ लाख रुपये मोजणार आहे.

 

रुग्णालयात पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार मे. कुमार फूड्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदार एका पोळीमागे २.६५ रुपये दर आकारणार असून १ हजार, ९६ दिवस ताज्या पोळ्यांचा पुरवठा करणार आहे. यापूर्वीच्या कंत्राटदाराने शीव रुग्णालयाला २.४० रुपये दराने पोळ्यांचा पुरवठा केला होता. मात्र आता नवीन कंत्राटदार वाढत्या महागाईचे कारण देत एका पोळीमागे २५ पैसे जास्त दर आकारून या पोळ्यांचा पुरवठा करणार आहे. बाजारात म्हणजे छोट्या हॉटेल्समध्ये एका पोळीची किंमत किमान ५-८ रुपये तर जरा चांगल्या हॉटेल्समध्ये एका पोळीची १०-१५ रुपये दर आकारण्यात येतात. मात्र, कंत्राटदार २.६५ रुपये दराने या पोळी पुरविणार असल्याने या पोळ्यांचा दर्जा कसा असणार याची तपासणी कोण करणार, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.

 

मुंबई महापालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांपैकी एक शीव रुग्णालय आहे. या रुग्णालयात विरार, डहाणू, पालघर, कर्जत, रायगड, कोकण येथून हृदयरोग, कीडनी, मेंदू, क्षयरोग, डेंग्यू आदी विविध आजारांनी त्रस्त रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. पालिकेच्या या रुग्णालयात आर्थिक परिस्थिती चांगली नसणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होतात. उपचारासाठी राहणार्‍या रुग्णांना दोन वेळचे जेवण, नाश्ता मोफत देण्यात येतो. या जेवणात दोन वेळात प्रत्येकी दोन याप्रमाणे चार पोळ्या दिल्या जात आहेत. पालिकेने त्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराचे कंत्राट संपुष्टात आल्याने नवीन कंत्राटदार नेमण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@