सुदानमध्ये एलपीजी स्फोट, १८ भारतीय नागरिक ठार झाल्याची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019
Total Views |


sudan_1  H x W:


नवी दिल्ली : सुदानमधील सिरेमिक कारखान्यात एलीपी टँकरचा स्फोट झाला आणि १८ भारतीयांसह २३  जण ठार झाले. या अपघातात १३०  हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मंगळवारी झालेल्या घटनेत सुदानमधील भारतीय दूतावासाने भारतीयांच्या मृत्यूची नोंद केली. मात्र, त्यांनी मृतांची संख्या दिली नाही.

याबाबत माहिती देताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले, “आम्हाला नुकतीच ही वाईट माहिती मिळाली आहे. सुदानची राजधानी खार्तूमच्या हद्दीत 'सलूमी' नावाच्या टाइल बनवण्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे.”






ते म्हणाले पुढे की, यात काही भारतीयांचे प्राण गेले आहेत ही फार खेदाची बाब आहे, तर बरेच जण गंभीर जखमी आहेत. दूतावासाने सांगितले की, कारखान्यात ५०हून अधिक भारतीय कामगार काम करतात.”
@@AUTHORINFO_V1@@