१०० कोटी हिंदू असलेले भारत हे हिंदू राष्ट्रच : रवी किशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019
Total Views |

ravi kishan_1  


 

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व विधेयकला बुधवारी मंजुरी देण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना 'भारतात हिंदूंची लोकसंख्या १०० कोटी आहे. साहजिकच हे एक हिंदू राष्ट्रच आहे,' असं भाजपचे खासदार अभिनेते रवी किशन यांनी म्हटले आहे.

 

संसद भवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकांचे समर्थन केले. 'हे विधेयक संसदेत येणे हा प्रत्येक हिंदूसाठी अभिमानाचा क्षण आहे,' असे रवी किशन म्हणाले. 'भारतात मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. असे असतानाही हिंदूंचे स्वतंत्र अस्तित्व, ओळख आणि संस्कृती जिवंत आहे, हा एक चमत्कारच आहे. भारत नावाच्या मातृभूमीमुळेच हे शक्य झाले आहे. १०० कोटी लोक एकाच ठिकाणी राहतात ही अभिमानाची गोष्ट आहे. भारताला संपूर्ण जगात मान आहे,' असे ही ते म्हणाले. 

 

सुधारित नागरिकत्व विधेयक २०१९ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कॅबिनेटने बुधवारी मंजुरी दिली आहे. यामधून अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या बिगर मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग सोपा होणार आहे. तसेच हिंदू, शिख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिस्ती धर्माच्या शेजारील देशाच्या नागरिकांना सहज नागरिकत्व मिळणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@