पाकिस्तानातून आलेल्या आठ शरणार्थींना भारताचे नागरिकत्व बहाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |


kota_1  H x W:



कोटा
: राजस्थानच्या कोटामध्ये पाकिस्तानमधील आठ शरणार्थीना नवीन वर्षाच्या मुहूर्तावर भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. या सर्व पाकिस्तानी शरणार्थ्यांना सोमवारी अधिकृतपणे भारताचे नागरिकत्व देण्यात आले. सुमारे वीस वर्षांपासून कोटा येथे वास्तव्यास असलेल्या या पाकिस्तानी निर्वासितांना जिल्हाधिकारी ओमप्रकाश कसेरा यांनी नागरिकत्व प्रमाणपत्र दिले. हे सर्व लोक सिंधी समाजातील आहेत आणि ९०च्या दशकात ते भारतात आले होते. तथापि, कोटा येथे स्थायिक होण्यापूर्वी हे लोक भटके व अस्थिर जीवन जगत होते.



जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की
, 'जिल्हा प्रशासनाने आठ जणांसाठी नागरिकत्व अर्ज पाठविला होता. गृह मंत्रालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला आणि प्रमाणपत्र पाठविले जे आम्ही त्या लोकांना दिले आहे.' गुरुदासमल, विद्या कुमारी, इलामल, सुशीला बाई, रुक्मणी, नरेश कुमार, सेवक आणि कौशल्यबाई अशी आठ जणांची नावे असून त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. नागरिकत्व मिळाल्यानंतर या सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, त्यांना इतका आनंद झाला आहे की ते व्यक्त नाही करू शकत. इतर लोकांच्या नागरिकत्वासाठी अर्ज गृह मंत्रालयाकडे प्रलंबित आहे आणि आयबीमार्फत चौकशी केल्यावरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

@@AUTHORINFO_V1@@