या ‘गांधीं’चा धर्म नेमका कोणता?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019   
Total Views |

vedh_1  H x W:


काँग्रेसची सेक्युलॅरिझमची व्याख्याच मुळी विचित्र. कुठल्याही जातीधर्माचे असाल आणि मुसलमानांशी सौहार्दाने वागलात, मिळूनमिसळून राहाल तरच तुम्ही सेक्युलर. पण, इतर धर्मीय हिंदूंशी कसे का वागेना, हिंदूंनी मात्र तोंडातूनब्रकाढायचा नाही. सहिष्णुतेचं दर्शन घडवायचं. पण, हिंदू आपल्या धर्माच्या बाजूने उभा राहिला की तोसेक्युलरच्या काँग्रेसी व्याख्येतून बाद ठरतो. पण, इतर धर्मीयांनी आपल्याच धर्माच्या नावाखाली कितीही कांगावा केला, उलथापालथ केली तरी ते मात्र भले सेक्युलर! या अशा अंध समजुतींमुळेच गांधी बंधुभगिनींना हिंदू धर्म कधी समजलाच नाही आणि यापुढेही समजेल इतकी त्यांची कुवतच नाही. ‘सीएएकायद्याविरोधात उत्तर प्रदेशांत मोठी हिंसा उसळली. सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी ज्या समाजकंटकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, त्यांच्याकडून दंडवसुली सुरू करून योग्य ती शिक्षाही दिलीच. पण, प्रियांका गांधींना योगींची ही भाषा, कृती म्हणे सूडाची वाटली. त्यावरून चक्क प्रियांका गांधींनी योगी आदित्यनाथांना हिंदू धर्मात सूड आणि हिंसेला स्थान नसल्याचा सल्ला देणे म्हणजे वाघाला डरकाळी फोडायला शिकवण्यासारखेच आणि योगींना सल्ला दिला, तोही त्यांच्या भगव्या वस्त्रांची आठवण करून देत. वा रे प्रियांका वा, ज्या हिंदू धर्माविषयी तुम्ही, तुमच्या पक्षाने कायम घृणा, द्वेष बाळगला, हिंदू या पवित्र शब्दापुढेदहशतवादजोडण्याचे पाताळयंत्री कुभांड रचले, आज त्याच हिंदू धर्माच्या शिकवणुकीचे धडे आणि तेही एका योगीला आठवण करून देताना मनाची नाही तर जनाचीही लाज वाटू नये? निवडणुकांपूर्वीजनुवेधारीम्हणून मिरवत मंदिरामंदिरांमध्ये माथा टेकवत फिरणारे तुम्ही तरसिझनल हिंदूआणि तुमच्याकडून त्या योगींनी हिंदुत्वाचे धडे घ्यावे? ज्या भगव्या रंगाला तुम्ही दहशतवादाशी जोडले, त्या भगवेधारी मुख्यमंत्र्याला तुम्ही शिकविणार हिंदूंची लक्षणे कोणती ते? प्रियांकांनी असल्या नसत्या फंद्यात पडता, आधी तुम्हागांधींचा नेमका धर्म कोणता, तो एकदाचा स्पष्ट करावा. या आडनावाची खरी कूळकथाच सांगावी. उगाच हिंदूंचा कैवार घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न समजण्याइतकी हिंदू जनता नक्कीच मूर्ख नाही. कारण, ‘हिंदुत्व हमारी शान है और भगवा हमारी पहचान.’ म्हणून या पवित्र भगव्याचा आणि भगवेधारींचा अपमान केलात तर आता जशास तसेच उत्तर मिळेल!



हिंदुत्वविरोधाचा काँग्रेसी डीएनए

भगव्या कपड्यांवरून प्रियांका गांधी यांनी नाहक योगी आदित्यनाथांवर टीकेची झोड उठवली. इतकेच नाही, तरहा देश करुणेचं प्रतीक असलेल्या प्रभू रामचंद्र आणि कृष्णाचा आहे. पण मुख्यमंत्री योगी हे सूडाची भाषा करतात,” असा आरोपही त्यांनी केला. मुळात, प्रियांका गांधींना हिंदू धर्माविषयी प्राथमिक माहितीच किती हा प्रश्न पडावा. आता ज्या राम आणि श्रीकृष्णाचे प्रियांकांनी दाखले दिले, ते अधर्माविरोधातच लढले. रामाने रावणाचा वध केला, तर कृष्णाने महाभारतात पांडवांची साथ देत युद्धभूमी जिंकली. राम आणि श्रीकृष्णाने अन्याय, अधर्माचा पाडाव केला. ते दोघेही करुणेचे प्रतीक असले तरी ते तितकेच त्यांच्या अफाट शक्ती, विराट संग्रामासाठीही ओळखले जातात. त्यामुळे राम, श्रीकृष्णांवर केवळकरुणेचा असा शिक्का लावून प्रियांका गांधींना नेमके काय सूचित करायचे आहे? खरं तर राम-कृष्ण यांचे मुखात नावही यासिझनल हिंदूंच्या तोंडी नसते. एवढेच काय, तर अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी काँग्रेस कधी तरी अनुकूल होती काय, याचे उत्तर प्रियांका गांधींनी त्यांच्या मातोश्रींना विचारून द्यावे. त्यामुळे ज्या भगवान रामाचे तुम्ही केवळ राजकीय स्वार्थासाठी नाव मुखी घेता, त्याच्याबद्दल तुमच्या मनात, तुमच्या पक्षात किती देवभाव, प्रेमभाव आहे, हे वेगळे सांगायला नकोच. प्रियांका गांधी ज्या अधिकारवाणीने हिंदुत्वाचे दाखल देत फिरत होत्या, तेवढ्याच उच्चरवात त्या ओवेसींनाइस्लाम हा शांततेचा धर्म आहेवगैरे नसीहत देण्याच्या फंद्यात तरी पडतील का? राम-कृष्णाने धर्मसंरक्षणार्थ या भूमीवर अवतार घेतला. पण, काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवाराने नेहमीच राम-कृष्णाला पूजणार्‍या हिंदू संस्कृतीचा, हिंदुत्वाच्या पाईकांनाच पदोपदी अपमानित केले. कायम मुस्लीम अनुनयाची भूमिका घेत हिंदूंना ग्राह्य धरून त्यांची वेळोवेळी फसवणूक केली. सत्तेत राहायचे असेल तर हिंदुत्ववादी भूमिका सोडायला शिवसेनेसारख्या पक्षाला भागही पाडले. अशा ढोंगी लोेकांच्या तोंडी रामकृष्णाचे नावही शोभत नसते. तेव्हा, काँग्रेसने भगवान श्रीकृष्णांचेजो धर्माच्या बाजूने उभा नाही, तो या धर्माच्या विरोधातच असतो,’ हे वचन लक्षात घ्यावे. कारण, हिंदुत्वविरोध हाच काँग्रेसचा डीएनए आहे, हे अघोषित सत्यच!

@@AUTHORINFO_V1@@