हा 'भगवा' जनतेची सेवा करण्यासाठीच !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |

Yogi Adityanath _1 &

 


लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगव्या वस्त्रांवरून टीपण्णी करणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींना चांगलेच खडेबोल सुनावले. 'योगी आदित्यनाथ ऑफीस' या ट्विटर हॅंडलद्वारे प्रियांका गांधींना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यात प्रियांका गांधी यांचा उल्लेख नसला तरीही रोख का त्यांच्याकडेच आहे, हे स्पष्ट दिसते.


 

 

"जनतेच्या सेवेसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवा धारण केला आहे. सर्वस्वाचा त्याग करत त्यांनी भगवा धारण केला आहे. भगव्याचे प्रतिनिधीत्वही ते करतात. भगवा हा जनतेच्या कल्याणासाठी आहे. राष्ट्रनिर्माणासाठी आहे आणि योगी आदित्यनाथ या मार्गावरील वाटसरू आहेत. भगव्यात जनकल्याण आहे.", असे ट्विट योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयातर्फे करण्यात आले.



 

"सन्यासींच्या सेवा यज्ञात जे कुणीही अडचणी निर्माण करतील, त्यांना त्यांचे फळ मिळतील. घराणेशाहीतून ज्यांना राजकीय वारसा मिळाला ते त्यागातून देशसेवा आणि समाजकल्याणाचे महत्व कसे समजतील?", असा सवाल प्रियांका गांधींना विचारण्यात आला आहे. लखनऊ येथे एका पत्रकार परिषदेत प्रियांका गांधी यांनी भगव्या वस्त्रांवरून मुख्यमंत्री योगी आदित्याथ यांच्यावर टीका केली होती. त्याला आज योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयातर्फे ट्विट करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@