...तर एअर इंडिया बंद होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |

air _1  H x W:


मुंबई : आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या एअर इंडियाला जर खरेदीदार मिळाला नाही, तर ती पुढील वर्षीच्या जूनपर्यंत सेवा बंद करावी लागण्याची शक्यता असल्याची माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर तुकड्या-तुकड्याने मिळालेल्या मदतीवर जास्त काळापर्यंत गाडी चालवली जाऊ शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


उड्डाणाअभावी एअर इंडियाची १२ छोटे विमाने उभी आहेत. त्यांना पुन्हा चालू करण्यासाठी निधीची गरज असून सुमारे ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज या विमान कंपनीवर आहे. संभाव्य खरेदीदार मिळाला नाही तर पुढील वर्षीच्या जूनपर्यंत एअर इंडिया जेट एअरवेजप्रमाणे रस्त्यावर येऊ शकते. सरकारने खासगीकरणाच्या योजनांदरम्यान कर्जाखाली दबल्या गेलेल्या कंपनीत आणखी गुंतवणूक करण्यास नकार दिल्यामुळे एअर इंडियाला मदतीची तरतूद करुन काम करावे लागत आहे. अशा पद्धतीने दीर्घ काळापर्यंत ही कंपनी चालणे कठीण आहे.


मोठ्या मुश्किलीने आम्ही या परिस्थितीत कसे तरी काम करत आहोत. आम्ही अशा स्थितीत जूनपर्यंत काम करु शकतो. जर कोणी खरेदीदार मिळू शकला नाही तर आम्हाला
सेवा बंद करावे लागेल. कंपनी सुरु राहावी म्हणून आम्ही सरकारकडे २४०० कोटी रुपयांची सरकारी मदत मागितली होती. परंतु, फक्त ५०० कोटी रुपयाचीच सरकारने सरकारी मदत दिली असल्याचे एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एअर इंडियामधील आपल्या हिस्स्याची विक्री करण्यासाठी सरकार रुची पत्र जारी करु शकते. खरेदीदार मिळाल्यास
व्यवहार पूर्ण करण्यासाठी किमान सहा महिने लागू शकतात. मात्र यासाठी पुढील महिन्यात विक्री प्रक्रिया सुरु होणे गरजेचे आहे. परंतु, सध्याची आर्थिक स्थिती पाहता गुंतवणूकदार मिळण्याची शक्यता कमी आहे.

@@AUTHORINFO_V1@@