प्रियांका नकली 'गांधी' आडनाव बदलून 'फिरोझ' करावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |


sadhvi jyoti _1 &nbs


नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भगवे कपड्यांबाबत निशाणा साधणाऱ्या कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा यांच्यावर पलटवार केला. मंगळवारी त्या म्हणाल्या की, 'बनावट गांधी' असणाऱ्यांना भगवा काय समजणार ? त्यांनी सुचवले की,प्रियांका यांनी आपले नाव बदलून 'फिरोज प्रियांका' करावे.'



साध्वी ज्योती म्हणाल्या की
,'प्रियांका गांधींना भगवा रंग समजत नाही कारण त्या बनावट गांधी आहेत. त्यांनी गांधींना त्यांच्या नावासमोरून काढून प्रियांका फिरोज करायला हवे. प्रियांकाला योगी सरकारकडून अडचणीत येत आहेत, कारण योगी सरकारकडून दोषींवर कठोर कारवाई केली जात आहे."



त्या म्हणाल्या की
, "प्रियांकाने बाहेर येऊन स्पष्टीकरण द्यावे की ती दंगली करणाऱ्यांच्या पाठीशी आहे कि नाही. कॉंग्रेस सरचिटणीस यांनी 'भगवा' विषयी अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. योगींवर ज्याप्रकारे त्यांनी टीका केली त्यावरून असे दिसते की खोटे नावे वापरणाऱ्या लोकांना, सगळे एकसारखे दिसतात. ते म्हणाले की,भगवा हा ज्ञान आणि जिव्हाळ्याचा प्रतिक आहे. प्रियांकाने लोकांना सीएएच्या विरोधात भडकवले.

@@AUTHORINFO_V1@@