ठाकरे सरकारचे नाराज आमदार राजीनामा देणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |

NCP _1  H x W:

 


मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही नाराजीनाट्य सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरांना आवरणे तिन्ही पक्षांची डोकेदुखी ठरत आहे. मंत्रिपदासाठी संधी न मिळाल्याने माजलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोलंकी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. याचा एकत्रित परिणाम बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणात पडणार आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली आहे. त्यानंतर नाराज सोलंकी यांचे बंड शमवण्यास अजित पवारांना यश आले आहे. 

 

अजित पवार म्हणाले, "आम्ही प्रकाश सोलंकी यांची समजूत काढण्याच काम करत आहोत. मंत्रिमंडळ विस्तार होताना सर्वांना त्यात सामाविष्ठ करणे शक्य होणार नाही. ज्यांना मंत्रिपद दिली गेली नाही त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे,' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादीकडून आता डॅमेज कण्ट्रोलचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता महिनाभरानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षातील असंतोष उफाळून आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@