नागालँड विधानसभेचे अध्यक्ष विखो-ओ योशू यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |


yoshua_1  H x W


कोहिमा : नागालँड विधानसभेचे अध्यक्ष विखो-ओ-योशू यांचे सोमवारी रात्री उशिरा मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. ते ६७ वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन योशु यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधानांनी ट्वीट केले की,''नागालँड विधानसभेचे अध्यक्ष विखो-ओ-योशु यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले.ते अतिशय एक कष्टकरी नेते होते ज्यांनी आपले जीवन नागालँडच्या प्रगतीसाठी वाहिले. ते म्हणाले की, दुःखाच्या या प्रसंगी माझे विचार त्यांचे कुटुंबिय आणि समर्थकांसह आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."






एनडीपीपीचे नेते योशु यांना फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचे निदान झाले आणि त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दहा मुले आहेत. कुटुंबीयांनी सांगितले की
, योशू यांचा मृतदेह मंगळवारी विमानाने नागालँडमध्ये आणला जाईल. योशू कोहिमा जिल्ह्यातील दक्षिण अंगमी -१ मतदारसंघातून तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले. २००८ आणि २०१३मध्ये त्यांनी नागा पीपल्स फ्रंट (एनडीएफ)च्या तिकिटावर विजय मिळविला. त्यानंतर त्यांनी सल्लागार आणि संसदीय सचिव म्हणून अनेक विभागांत काम केले. २०१८च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते एनडीपीपीमध्ये सामील झाले. २०१८ मध्ये त्यांनी सलग तिसऱ्यांदा दक्षिणेकडील अंगामी -१ च्या जागेवर निवडून आले राज्य विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री निफियू रिओ यांनी योशुच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल म्हणाले, विखो-ओ-योशू यांच्या मृत्यूने नागालँड लोकांनी मोठा आणि आदरणीय नेता गमावला.


आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री रिओ म्हणाले की
, ‘योशु दयाळू आणि सौम्य व्यक्तीमत्व होते. नागालँड विधानसभेच्या सभापतींच्या निधनामुळे मला अतिशय दु: ख झाले आहे. नागालँडने एक महान नेता गमावला. दरम्यान, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) राखो म्हणाले की, ‘सोमवारपासून नागालँडमध्ये तीन दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@