भारतीय सुरक्षा 'या' ३ मित्रांच्या देखरेखेखाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : नुकतेच लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मंगळवारी लष्कर प्रमुख पदावर विराजमान झाले. जनरल बिपीन रावत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नरवणे यांच्या हाती ही सूत्र दिली आहेत. जनरल रावत हे यापुढे देशाचे पहिले सीडीएस म्हणजेच सैन्यदल प्रमुख असणार आहेत. भारतीय संरक्षणाच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

 

या बदलांमध्ये आर.के.एस. भदौरिया यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय वायुदल प्रमुख पदाची धुरा सांभाळली. तसेच, भारताच्या नौदल प्रमुखपदी करमबीर सिंग हे जबाबदारी पार पाडत आहेत. विशेष म्हणजे या तिघांमध्ये एक समान धागा आहे. लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख आणि वायुदल प्रमुखपदी असणाऱ्या या तिन्ही अधिकाऱ्यांची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे.

 

काय आहे या ३ प्रमुखांमधील समान धागा?

 

तिन्ही अधिकाऱ्यांमध्ये पहिला समान धागा म्हणजे त्यांचे वडील आणि भारतीय वायुसेना. या तिघांच्याही वडिलांनी वायुसेनेमध्ये विविध पदांवर रुजू असताना देशाची सेवा केली. लष्कर प्रमुख नरवणे आणि ऍडमिरल सिंग यांचे वडील तर एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. तर, वायुदल प्रमुख भदौरिया यांचे वडील हे निवृत्त फ्लाईंग ऑफिसर आहेत.

 

सध्याच्या घडीला देशाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेले हे तिन्ही अधिकारी एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या वर्ष १९७६चे विद्यार्थी आहेत. हे तिघेही एनडीए कोर्सच्या ५६व्या तुकडीचा भाग होते. पुण्यातील एनडीएमध्ये त्यांनी रितसर शिक्षण घेत त्यानंतर आपआपल्या सर्व्हिस अकॅडमीची वाट धरली. पण, त्यांनी ही वाट एकाच वर्षी सुरु केली होती. ही बाब फार कमी वेळा निदर्शनास आली आहे की एनडीएतून एकाच वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी इतक्या महत्त्वाच्या पदांचा पदभार स्वीकारला आहे.

@@AUTHORINFO_V1@@