पदभार स्वीकारण्याआधी बिपीन रावत यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : जनरल बिपिन रावत १ जानेवारी रोजी देशातील पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत. मंगळवारी लष्कर प्रमुख पदावरून राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली वाहिली. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे २८ वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्विकारणार आहेत. लष्कर प्रमुख म्हणून जनरल रावत यांनी परेडला शेवटची सलामी दिली.

 

जनरल बिपीन रावत सांगितले की, "लष्कर प्रमुखाचे काम अवघड असते. काही काम अपूर्ण राहतात. नवीन जबाबदारी स्विकारल्यानंतर योजना आखणार आहे. मी उत्तर, पूर्व, पश्चिम आणि बर्फाळ भागात तैनात असलेल्या आणि आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या सैनिकांना शुभेच्छा देतो. नरवणे त्यांचे कार्य योग्यरित्या पार पाडतील याचा माल विश्वास आहे. गेल्या तीन वर्षांत मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच मी माझा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो."

@@AUTHORINFO_V1@@