ऑस्ट्रेलियातील वणव्यात ४ हजार लोक अडकले ; तापमान ४० डिग्रीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |


mallacoot_1  H



सिडनी
: ऑस्ट्रेलियात जंगलात पेटलेल्या वणव्याची झळ आता समुद्रकिनारी असलेल्या लोकप्रिय अशा मल्लकुटा या पर्यटन स्थळापर्यंत येऊन पसरली आहे. सुट्टीसाठी या भागात फिरायला आलेले हजारो लोक आणि स्थानिक रहिवासी अडकले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत सांगितले की,मल्लकुटा शहरात चार हजार लोक अडकले आहेत. विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला आलेल्या ३०,००० पर्यटकांना हा परिसर रिकाम खाली करण्याची सूचना दिली आहे.हे ठिकाण आग लागलेल्या त्या शेकडो शहरांपैकी एक आहे.


व्हिक्टोरिया आपत्कालीन विभाग प्रमुख कमिशनर अँड्र्यू क्रिस्प सांगतात
, मल्लकुटा याभागात आमच्याकडे तीन दल कार्यरत आहेत जे समुद्रकिनार्‍यावर ४,००० लोकांची काळजी घेतील. आवश्यकता भासल्यास लोकांना समुद्राद्वारे किंवा हवाईमार्गे बाहेर काढले जाईल. आगीपासून बचाव होण्याची गरज भासल्यास समुद्रात उतरता यावे यासाठी त्यांनी लाइफ जॅकेट घातले असल्याचे सोशल मीडियावरून स्थानिक रहिवाशांनी सांगितले.


'
न्यू साउथ वेल्स रूरल फायर सर्व्हिस'ने माहिती दिली कि, ही आग आज सकाळी खूप वेगाने पसरत असल्याचे दिसून आले. यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. आगीच्या मार्गाने न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. वनक्षेत्रातून जाणे टाळा. जमल्यास मोठी शहरे किंवा समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने जा.



४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमान


बिकट परिस्थिती लक्षात घेता सोमवारी देशातील चार राज्यांत आणीबाणीचा इशारा देण्यात आला. या भागातील पर्यटकांसह आग विझविण्यात गुंतलेल्या अग्निशमन दलानाही परत जाण्यास सांगितले आहे. ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आणि ताशी १०० किलोमीटर वेगाच्या हवेमुळे तीस हजार लोकांना व्हिक्टोरिया प्रांतातील पूर्व गिप्सलँड हे क्षेत्र सोडण्यास सांगण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये बर्‍याच महिन्यांपासून वारंवार आग लागत आहे
, परंतु उष्णता आणि वेगाच्या वाऱ्यांमुळे हि आग अधिक पसरली.

@@AUTHORINFO_V1@@