धन्य हे विचारवंत आणि त्यांचे फतवे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019   
Total Views |

japa_1  H x W:



मानवी दूध बँक सुरू करण्याआधी तुम्ही इस्लाम विद्वानांशी संपर्क संवाद साधलात का? ही दूध बँक इस्लामच्या नजरेतून ‘हराम’ आहे. कारण, इस्लाममध्ये रक्तापेक्षा दुधाचं नात महत्त्वाचं. एका आईचे दूध पिणारी मुलं मुली एकमेकांशी लग्न करू शकत नाहीत. या दूध बँकेतले एका मातेचे दूध बालकांनी प्यायले. पुढे त्यातलेच कुणाचे कुणाशी लग्न झाले तर हे पाप आहे. त्यामुळे बांगलादेशात सुरू होणारी मानीव दूध बँक बंद करा,” असा जबरदस्त इशारा बांगलादेशचे संयुक्त महासचिव आणि ‘नॅशनल उलेमा मशाइक आइम्मा कौन्सिल’ महासचिव गाजी अतुर रहमान यांनी दिला. त्यानंतर बांगलादेशाचे मुस्लीम विचारवंत तत्काळ एकवटले. ‘मुस्लीम तेहजीब खतरेमे’ म्हणत त्यांनी सरकारला कायदेशीर नोटीस पाठवली. मग काय, बांगलादेशमध्ये सुरू होणारी पहिलीवहिली मानवी दूध बँक सुरू होण्याआधीच गुंडाळली गेली.


आईचं दूध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असलं तरी काही मातांना विविध कारणांमुळे बाळांना स्तनपान देणं शक्य होत नाही
. या जन्मदात्रीच्या दुधापासून वंचित राहणार्‍या बाळांसाठी पर्याय आहे, ‘ह्यूमन मिल्क बँक’चा म्हणजे ‘मानवी दुग्ध पेढी’चा. १९८९ साली डॉ. अल्मिडा यांनी आशिया खंडातील पहिली मातृदुग्धपेढी स्थापन केली. यात आई आपल्याकडचं जास्तीचं दूध दान करते. पण, बांगलादेशमध्ये या मानवी दूध बँकेच्या विरोधात फतवा निघाला.


इस्लाम विचारवंतांचे फतवे असे चित्रविचित्र का बरं असतात
? विद्वत्ता ही मानवी शाश्वत मूल्यांचा जयघोष करणारी, मानवी विकासाला, मानवी जीवनाला प्रेरक असणारी हवी. पण बांगलादेशी मुस्लीम विचारवंतांची विद्वत्ता यामध्ये कुठे बसते? तसेही गेल्या काही दशकात याच पठडीतल्या विचारवंतांनी असे काही फतवे काढले की, सार्‍या जगाने तोंडात बोटे घातली. त्यापैकी काही नमुनेदार फतवे. इजिप्तच्या अल अझहर विद्यापीठाचे विद्वान डॉ. इझ्झत आतिया यांनी काढलेला फतवा. त्यांचे म्हणणे मुस्लीम स्त्रीने परक्या मुस्लीम पुरुषासोबत कुठेही एकटे राहू नये. अगदी सरकारी किंवा खाजगी नोकरीच्या ठिकाणीही. हे ‘हराम’ आहे. असे केल्यास यावर पापक्षालन म्हणजे नोकरी करणार्‍या स्त्रीने सहकर्मचार्‍याला दिवसातून पाच वेळा स्तनपान करावे. त्यामुळे पुरुषाच्या नजरेत तिच्याविषयी मातृभाव निर्माण होईल. मग माता आणि पुत्र म्हणून ते एकत्र काम करू शकतात.


याच विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता रशद हसन खली या विद्वानाने तर इस्लामचा हवाला देत असाही फतवा काढला की
, स्त्री-पुरुषांनी लैंगिक क्रिया पूर्ण अंग झाकून कराव्यात. वाचायलाही आपल्यासारख्यांना संस्कृतीच्या मर्यादा येतात. पण हे असले विद्वान? असाच एक फतवा. अल्लाहने मंगळाबाबत काहीच म्हटलेले नाही. तुम्ही कोण, मंगळ आहे म्हणून मंगळ ग्रहावर जाणारे? तसेच मंगळावर जाताना धोका आहे. तिथे जाताना माणूस मरू शकतो. अल्लाहच्या हुकूमाशिवाय तुम्ही माणसाला मरायला सोडणारे कोण? तर २०११ साली युरोपच्या काही मुस्लीम विद्वानांनी फतवा काढला की, महिलांनी केळं, काकडी, गाजर वगैरे फळं, फळभाज्या खायच्याच नाहीत. का, तर म्हणे त्या पुरुषांच्या जननेंद्रियांसारख्या दिसतात. आता या फतव्याला काही तर्क आहे का? पण नाही, हाही फतवा मुस्लीम विद्वानांचाच!


आपल्याकडेही
दारूल उलूम देवबंद’ असे फतवे काढतेच. त्यापैकी एक की मुस्लिमांनी अवयव किंवा रक्तदान करू नये. ‘दारूल देवबंद’ने सोशल मीडियावर फोटो न टाकण्याचाही फतवा काढला आहे. तसेच समाजमाध्यमांवर भावना व्यक्त करणार्‍या स्माईली वापरल्या जातात, तर ‘देवबंद’चा फतवा की, असे स्माईली वापरणे अल्लाहचा अपमान आहे. अल्लाह भावना निर्माण करतो, त्या भावनांचे चित्र पाठवणारे तुम्ही कोण? इतकेच काय, मुस्लीम महिलांनी त्यांच्या घरातील पुरुषांच्या अनुमतीशिवाय भुवया कोरू नये, असाही फतवा याच ‘देवबंद’ने काढलेला. (पण सध्या त्यांच्या या फतव्याला मुस्लिमांनी मनावर घेतलेले दिसत नाही.) तसेही या तिन्ही गोष्टींनी धर्माचे काय नुकसान होणार आहे? पण असे शेकडो फतवे दररोज निघत आहेत. अगदी कुणाचा खून करा, असाही फतवा काढला जातो. या फतवा कंपनींचे करायचे काय? बांगलादेशाच्या मुस्लीम विचारवंतांमुळे, त्यांच्या फतव्यामुळे, पुन्हा एकदा जगभराच्या विचारवंतांमध्ये वादळ उठले आहे. धन्य हे विचारवंत आणि त्यांचे फतवे...

@@AUTHORINFO_V1@@