ज्येष्ठ रंगकर्मी अजित भगत व ललित प्रभाकर यांना सत्यस्मृती पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2019
Total Views |

LALIT_1  H x W:


कल्याण : सुप्रसिद्ध नाटककार, रंगकर्मी पंडीत सत्यदेव दुबे यांच्या स्मृती दिनानिमित्त 'चार मित्र' नाट्य संस्थेतर्फे ‘सत्यरंग नाट्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात रंगलेल्या या पहिल्याच सोहळ्यात ज्येष्ठ नाट्यकर्मी अजित भगत यांना रोख १० हजार, स्मृतिचिन्ह देऊन राज्यस्तरीय तर युवा रंगकर्मी ललित प्रभाकर यांनाही सत्य स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले.


महापौर विनिता राणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. माजी महापौर राजेंद्र देवळेकर व शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर यांच्या हस्ते अजित भगत व ललित प्रभाकर यांना सत्य स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ललित
प्रभाकर यांचा पुरस्कार त्यांच्या मातोश्री हेमलता आणि वडील प्रभाकर भदाणे यांनी स्विकारला. कल्याणात नाट्य संस्कृतीचा वारसा चालवणाऱ्या 'चार मित्र' सारख्या संस्था कार्यरत असल्याने कल्याण ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते असे गौरवोद्गार माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी काढले. याप्रसंगी अजित भगत यांची मुलाखत प्रसिद्ध कलावंत अभिजीत झुंझारराव यांनी घेतली. यावेळी ते म्हणाले, कल्याणमध्ये रहात असलो तरी नाटकानिमित्त मी अँटॉप हिल येथेच मित्रांसोबत जास्त काळ होतो. अविष्कार या नाट्य संस्थेच्या माध्यमातून रोहिणी व जयदेव हट्टगंडी यांनी आयोजित केलेल्या २१ दिवसांच्या नाट्य शिबीरात मीही सहभागी झालो. येथूनच माझी नाटकाची सफर सुरु झाली. सत्यदेव दुबे यांच्यासोबत सहा नाटकात काम केले. त्यातून बरेच शिकायला मिळाले. नाटकातील शब्दोच्चर, स्पष्टता, अचूकता आणि शब्द उच्चारताना आपोआपच पडणारा दाब या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्याचे अजित भगत यांनी सांगितले.


महोत्सवाच्या पहिल्या सत्रात अविष्कार निर्मित
‘उमगलेले गांधी’ चे अभिवाचन करण्यात आले. ज्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी, सुहिता थत्ते, सुनिल जोशी, धनश्री करमरकर आणि दीपक राजाध्यक्ष यांनी गांधीच्या संदर्भातील विविध लेखांचे अभिवाचन केले. त्याला रसिक प्रेक्षकांचीही चांगली दाद मिळाली. तर शेवटच्या सत्रात नेब्यूला नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी 'चार मित्र' संस्थेचे माणिक शिंदे, किरण खांडगे आदी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

@@AUTHORINFO_V1@@