'ईडी' मागे लावली त्यांना आमंत्रण आणि आम्हाला... ? : राजू शेट्टी यांची आगपाखड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


कोल्हापूर : महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्याचे आमंत्रण न दिल्यामुळे घटक पक्षांमध्येच नाराजीचे सूर उमटले आहेत. कार्यक्रमानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा असलेल्या राजू शेट्टी यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. "ज्या लोकांनी ईडी, इनकम टॅक्स, सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण देण्यात आले. मात्र, महाविकास आघाडी उभी करण्यात सहभाग घेतलेल्या घटकपक्षांना शपथविधीवेळी बेदखल ठरवण्यात आले." अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

"संविधान, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यावर श्रद्धा असणाऱ्या लहान पक्षांनी भाजपसारख्या संधीसाधू पक्षाची साथ सोडून महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. मात्र, त्याच घटकपक्षांचा महाविकासआघाडीला विसर पडला. भविष्यात याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल." असे राजू शेट्टी यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी मंत्रिपदासाठी शपथ घेतली. परंतु, या शपथविधेमध्ये भाजपसह महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांनीच आक्षेप घेण्यास सुरुवात केली. भाजपने या शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर मंत्री पदाच्या वाटपावरून आणि काही घटक पक्षांना आमंत्रण न दिल्याने त्यांनीदेखील शपथविधीपासून दूर राहणे पसंत केले.

@@AUTHORINFO_V1@@