आज मंत्रीमंडळ विस्तार ; 'हे' असतील नवे मंत्री !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर आज दुपारी होणार आहे. दुपारी १ वाजता विधिमंडळ आवारात नवीन ३६ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात असलेल्या खातेवाटपासंदर्भातील वादामुळे उद्धव ठाकरे सरकारच्या स्थापनेपासून एक महिना मंत्रीमंडळ तयार होऊ शकले नव्हते.

 

गृह, वित्त, सहकार, उद्योग, महसूल, कृषी यासारख्या महत्वाच्या खात्यांवरून या तीन पक्षात वाद होते. त्यामुळे या सरकारचे पहिलेच विधिमंडळ अधिवेशन केवळ ६ मंत्र्यांना घेऊन पार पाडण्यात आले. हे अधिवेशन अवघ्या ८ दिवसात आटोपण्यात आले. मात्र, राजकीय परिस्थितीच्या दबावामुळे मंत्रीमंडळ विस्तार आता अधिक काळ टाळता येणार नाही, असे चित्र असल्याने मंत्रीमंडळ विस्तारास तीनही पक्षांच्या वरीष्ठांनी अखेर हिरवा कंदील दखवला आहे.

 

ही आहेत मंत्रमंडळातील संभाव्य नावे :

 

शिवसेना : अनिल परब, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर किंवा सुनील प्रभू, सुनील राऊत, उदय सामंत, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, तानाजी सावंत, संजय शिरसाट किंवा अब्दुल सत्तार.

 

काँग्रेस : के.सी.पाडवी, अशोक चव्हाण, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, विजय वड्डेटीवार, सुनील केदार, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, विश्वजित कदम.

 

राष्ट्रवादी काँग्रेस : अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे, दत्ता भरणे, अदिती तटकरे, संजय बनसोडे. 

@@AUTHORINFO_V1@@