महाराष्ट्रातील घनदाट व दाट वनक्षेत्रात घट !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2019
Total Views |

tiger_1  H x W:


२०१९ च्या वन सर्वेक्षण अहवालामधून वास्तव उघड


मुंबई (प्रतिनिधी) - गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या एकूण वनक्षेत्रात ९६ चौ.किमी वाढ झाली असली तरी घनदाट आणि दाट वनक्षेत्रात घट झाल्याचे वास्तव समोर आले आहे. २०१९ च्या वन सर्वेक्षण अहवालामधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

 

भारतीय वनांचा सर्वेक्षण अहवाल आज दिल्लीत केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रसिद्ध झाला. हा अहवाल दर दोन वर्षांनी प्रसिद्ध केला जातो. यामध्ये भारतीय सर्व प्रकारच्या वनांचे सर्वेक्षण करुन वन आच्छादित क्षेत्राची सद्यस्थिती मांडण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्राच्या वन क्षेत्रात २०१७ च्या तुुलनेत वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याच्या ३ लाख ७ हजार ७१३ चौ.किमी भौगोलिक क्षेत्रामधील ५० हजार, ६८२ चौ.किमी क्षेत्र वनाने आच्छादित होते. गेल्या दोन वर्षात त्यामध्ये ९६ चौ.किमीची भर पडली असून आता ५० हजार ६८२ चौ.किमी क्षेत्र वनाच्छादित आहे. मात्र, राज्यातील एकूण वनक्षेत्रात वाढ झाली असली तरी घनदाट व दाट वनक्षेत्रात घट झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

 

वन सर्वेक्षण अहवालांमध्ये वनांची विभागणी घनदाट, दाट आणि खुल्या स्वरुपाचे वन (असंरिक्षत) अशी करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात २०१७ साली ८ हजार ७३६ चौ.किमी क्षेत्रावर घनदाट आणि २० हजार ६५२ क्षेत्रावर दाट प्रकारचे वनपरिक्षेत्र होते. दोन वर्षानंतर त्यामध्ये अनुक्रमे १५ चौ.किमी आणि ८० चौ.किमीने घट झाली आहे. तर खुल्या स्वरुपाच्या वनक्षेत्रात १९१ चौ.किमीने वाढ झाली आहे. राज्यात जिल्हानुरुप वनक्षेत्रामध्ये वाढ होण्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. या जिल्ह्यातील वनक्षेत्र गेल्या दोन वर्षात १३८ चौ.किमीने वाढले आहे.

 

गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला घनदाट व दाट वनक्षेत्रामध्ये घट होऊन खुल्या स्वरुपाच्या वनक्षेत्रात वाढ होण्याचा कल यंदाही कायम राहिला आहे. वनाच्छादन कमी होण्यामागे नेहमी प्रकल्पांकरिता देण्यात आलेल्या वन जमिनींचा मुद्दा अधोरेखित करण्यात येतो. मात्र, अतिक्रमण झालेले वनक्षेत्र सरकारकडून अतिक्रमणधारकांच्या मालकीचे करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. - किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

@@AUTHORINFO_V1@@