डॉ. पायल तडवी प्रकरणी विभागप्रमुखांना क्लिन चिट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2019
Total Views |
Dr Payal Tadavi _1 &
 


मुंबई : डॉ. पायल तडवी रॅगिंग आणि आत्महत्येप्रकरणी नायर रुग्णालयातून निलंबित केलेल्या दोन प्रमुखांना क्लिन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणी तडवी कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. राज्य मानवी हक्क आयोगाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले होते. हा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप कुटूंबियांनी केला आहे.

 

राज्य मानवी हक्क आयोगाने नायर रुग्णालयाने निलंबित केलेल्या स्त्रीरोग विभागाच्या युनिट प्रमुख डॉ. चिंग ली व तत्कालीन विभागप्रमुख डॉ. एस. एस. शिरोडकर यांना क्लिन चीट मिळाली आहे. हा निर्णय मानवी हक्क आयोगापुरताच मर्यादित असून समांतर सुरू असलेल्या खटल्यावर आडकाठी येणार नाही, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

राज्य मानवी हक्क आयोगाने स्वत: हून दखल घेत सहा महिन्यांपूर्वी डॉ. पायल तडवी प्रकरणाची चौकशी सुरू केली. या तपासणीनुसार, पायलने तिच्या वरिष्ठ सहकाऱ्यांविरोधात केलेली तक्रार स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. एस. एस. शिरोडकर आणि युनिट प्रमुख डॉ. चिंग ली यांनी योग्य रितीने हाताळली असल्याचा निर्वाळा देत हे दोघेही या प्रकरणात दोषी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

नोव्हेंबर महिन्यात डॉ. पायल हिला त्रास होत असल्याचे तिच्या कुटुंबियांना समजले होते. पण, तक्रार करूनही योग्य ती चौकशी केली गेली नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच, आयोगाचा निर्णय एकतर्फी असल्याचा दावाही पायलचे पती डॉ. सलमान तडवी यांनी केला आहे.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@