सावंतवाडीत शिवसेनेचा गड भेदण्यात राणेंना यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2019
Total Views |
Narayan Rane Deepak Kesar
 


सावंतवाडी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तारामुळे महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण असतानाच नारायण राणे यांनी मात्र, सावंतवाडीत शिवसेना नेते दिपक केसरकर यांना दणका दिला आहे. कोकणात भाजपन शिवसेनेला जोरदार धोबीपछाड दिली आहे. सावंतवाडीझालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा तब्बल ३०९ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर भाजपच्या गोटा जोरदार जल्लोष करण्यात आला.

 

कित्येक वर्षांपासून सावंतवाडीत शिवसेनेचाच नगराध्यक्ष होता. मुळात दीपक केसरकर यांचा हा बालेकिल्ला मानला जात. त्यामुळे दीपक केसरकर विरूद्ध नारायण राणे असा थेट संघर्ष या मतदार संघात दिसून येतो. भाजप नेते नारायण राणे यांनी केसरकर यांना शह देत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणला आहे. त्यामुळे दिपक केसरकर यांच्या हातून मंत्रीपदासोबतच आता नगराध्यक्षपदही निसटल्याने शिवसेनेच्या गोटात मंत्रीमंडळ विस्ताराच्या दिनीही नाराजीच व्यक्त केली जात आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@