'आमचा विरोध कुटुंबाला नाही घराणेशाहीला आहे' : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |


AMIT SHAH_1  H



नवी दिल्ली
: काँग्रेसच्या प्रचंड गदारोळात एसपीजी सुरक्षा विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. यावेळी काँग्रेसने सभात्याग करत विधेयकाबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली. हे विधेयक मंजूर झाल्याने आता केवळ विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षा मिळणार आहे. माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा मिळणार नाही. विशेष म्हणजे हे विधेयक मंजूर झाल्याने गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षाही आपोआप मागे घेतली जाणार आहे.

 

यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले कि, "हे विधेयक केवळ एका कुटुंबाच्या हितासाठी आणण्यात आलेले नाही. गांधी कुटुंबीयांची सुरक्षा हटवण्यात आलेली नाही, तर ती बदलण्यात आली आहे. एसपीजी सुरक्षा ही एखाद्या कुटुंबासाठी असू शकत नाही. एसपीजी सुरक्षा म्हणजे स्टेट्स सिम्बॉल नाही."


केंद्रीय मंत्री अमित शाह पुढे म्हणाले
, "लोकशाहीमध्ये कायदा सर्वांसाठी समान असतो, एका कुटूंबासाठी स्वतंत्र कायदा नसतो. आम्ही कुटुंबाला विरोध करीत नाही. आमचा घराणेशाहीला विरोध आहे. केवळ गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढली गेली नव्हती. चंद्रशेखरजी, व्ही.पी. सिंह जी, नरसिंहराव जी, आय. के. गुजराल जी आणि मनमोहनसिंग जी यांची सुरक्षाही झेड प्लसमध्ये बदलली गेली आहे. परंतु कॉंग्रेसने कोणतीही नाराजी दाखविली नाही. मग गांधी कुटुंबीयांची नाराजी का?.






केरळमधील भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येवरूनही त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
ते म्हणाले कि, केरळमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जातात. काँग्रेस किंवा कम्युनिस्ट कोणाचीही सत्ता आली तरीही हत्या भाजप कार्यकर्त्यांच्याच होतात. भाजपाचे कार्यकर्तेही या देशाचे नागरिक आहेत, म्हणूनच माझ्यावर त्यांच्याही सुरक्षतेची जबाबदारी आहे. मी संपूर्ण देशाचा गृहमंत्री आहे."

 



"
देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहराज्यमंत्री आणि संरक्षणमंत्री यांना या तिघांना संरक्षण देण्यात आले आहे. त्याला देशातील सर्वोच्च सुरक्षा पुरविण्यात आली आहे. परंतु एसपीजी संरक्षण प्रदान केले जावे,असे म्हणणे योग्य नाही."हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@