भाजप देशातील महिलांसाठी लढते, तर काँग्रेस केवळ एकाच : पूनम महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |
खासदार पूनम महाजन यांचा क



नवी दिल्ली : काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत निर्मला सितारमण यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना पूनम महाजन यांनी काँग्रेसवर शरसंधान केले. "भाजप संपूर्ण देशातील महिलांच्या प्रश्नावर आपले मुद्दे मांडते. मात्र, काँग्रेस नेते केवळ एका परिवारातील महिलेच्या सुरक्षेबद्दल जाब विचारत असतात. देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी मुद्दे मांडताना ते दिसत नाही ते खरे निर्बल आहेत.", असा घणाघात त्यांनी खासदार अधीर रंजन यांच्यावर केला.

 

"हैदराबाद निर्भया प्रकरण लोकसभेत गाजल्यावर सर्व खासदार या प्रश्नावर एकवटले होते. मात्र, ज्यांच्या नावात धीर आहे, त्या अधीर रंजन यांचा धीर सुटला आणि त्यांनी देशाच्या अर्थमंत्र्यांवर टीप्पणी केली. त्यांना 'निर्बल' म्हणत त्यांचा अपमान केला. मात्र, याला त्यांनी अत्यंत निर्मळपणे उत्तर दिले. निर्बल तर तुम्ही आहात. की, देशात भाजप सरकारमध्ये सर्वाधिक महिला मंत्री आहेत. त्या देशासाठी काम करत आहे, तर तुम्ही काँग्रेसचे नेते केवळ एका महिलेच्या सुरक्षेबद्दल मुद्दे उपस्थित करत असतात. खरे निर्बल तर तुम्ही आहात. ज्यांनी देशातील प्रश्नांवर चर्चा करणे सोडून एकाच परिवारासाठी लढत असतात.", असे म्हणत नाव न घेत काँग्रेसला टोला लगावला.

 

काँग्रेस खासदार अधीर रंजन यांनी सोमवारी अर्थव्यवस्थेबद्दल सरकारला प्रश्न विचारत असताना केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांना 'निर्बला सीतारमण', असे संबोधले. त्यांच्यावर अशाप्रकारची टीका झाल्यावरही सितारमण यांनी आमच्यावर झालेली टीका आम्ही सहन करू, असेही म्हटले होते. मात्र, मंगळवारी शुन्यकालीन सत्रादरम्यान भाजप खासदार पूनम महाजन यांनी काँग्रेस खासदारांचा चांगलाच समाचार घेतला.

@@AUTHORINFO_V1@@