आयकर विभागाची कॉंग्रेसला नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |


congress_1  H x


नवी दिल्ली : ३३०० कोटी रुपयांच्या हवाला रॅकेट प्रकरणात हैद्राबाद येथील कंपनीकडून १७० कोटी रुपयांचा निधी स्वीकारल्याप्रकरणी आयकर विभागाने कॉंग्रेस पक्षाला नोटीस जारी करून, स्पष्टीकरण मागितले आहे. या हवाला प्रकरणाचा तपास करताना, मोठ्या प्रमाणात कराची चोरी झाली असल्याचे आयकर खात्याच्या तपासात उघडकीस आले. गेल्या महिन्यात आमच्या विविध पथकांनी दिल्ली, मुंबई आणि हैद्राबाद यासारख्या शहरांमध्ये छापे टाकले होते. यात पायाभूत क्षेत्रातील काही आघाडीच्या कंपन्यांचाही समावेश होता. यातून महत्त्वाची माहिती हाती लागल्यानंतर तपासाला आणखी पुढे नेण्याचा भाग म्हणून कॉंग्रेसला नोटीस जारी करण्यात आली असल्याचे एका वरिष्ठ तपास अधिकार्‍याने सांगितले. १७० कोटी रुपयांचा निधी हैद्राबाद येथील ‘मेघा इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड इंजिनीअरिंग’ या कंपनीने काँग्रेसला पाठविला असल्याचेही तपासातून समोर आले असल्याची माहिती या अधिकार्‍याने दिली.


या प्रकरणात काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबतच
, आंध्रप्रदेशातील काही राजकीय पक्षही आयकर खात्याच्या रडारवर आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयकर खात्याच्या शंभरावर पथकांनी हे छापे टाकले होते. कर बुडवेगिरीचे असंख्य प्रकरण यातून समोर आले होते. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, इरोड, पुणे, आग्रा गोव्यातील एकूण ४२ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. या छाप्यांमधून ३३०० कोटी रुपयांच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाला होता, तसेच या रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी आहेत, याची पुष्टीही झाली होती, असे या अधिकार्‍याने सांगितले. बोगस कंत्राट आणि पावत्यांच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्या सहभागी असून, कर बुडवून मिळालेला पैसा ही मंडळी हवालमार्गे इतरत्र वळता करायची. यात बेकायदेशीर मार्गांचाच वापर केला जायचा, असेही अधिकारी म्हणाला.

@@AUTHORINFO_V1@@