‘जिओ’चा ग्राहकांना आणखी एक धक्का

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |

JIO_1  H x W: 0


मुंबई : रिलायन्स जिओ फायबरच्या वापरकर्त्यांना यापुढे निःशुल्क ब्रॉडबॅंड सेवा मिळणार नाही. कंपनीने नवीन ग्राहकांकडून ब्रॉडबॅंड सेवेसाठी शुल्क आकरण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच कपंनी जुन्या ग्राहकांना देखील ब्रॉडबॅंड सेवेसाठी रिचार्ज करा किंवा पेमेंट करा अशा सुचना पाठवत आहे. अधिक नफा कमवण्याच्या उद्देशाने कंपनीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

जिओ फायबर वापरणाऱ्या ग्राहकांनी २५०० रुपयांची अनामत रक्कम जमा केलीली असून देखील त्यांच्याकडून आता अधिकचे सेवा शुल्क आकारण्यात येत आहे.


जिओ फायबर बाजारात अधिकृतपणे लाँच होण्यापूर्वी ही सेवा सब्सक्राइब केलेल्या तब्बल पाच लाख जिओ फायबरच्या ट्रायल ग्राहकांना कंपनीकडून आता टॅरिफ प्लॅनवर शिफ्ट करण्यात येणार आहे. ही प्रकिया पुढच्या एक महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. 'फ्री ब्रॉडबॅंड सेवा लवकरच बंद होणार असून या सेवेचे लाभ घेण्यासाठी जिओ फायबरच्या प्लॅन्सला सब्सक्राइब करा' अशी सुचना कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येत आहे.

जिओ फायबर लाँच होण्यापूर्वी कंपनीला आपल्या ग्राहकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु व्यावसायिक लाँचनंतर जिओ फायबरला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याचे एक मोठे कारण म्हणजे जिओ फायबरच्या महागड्या योजना असल्याचे म्हटले गेले. त्यामुळे आता अधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीने जिओ फायबरची फ्री सेवा बंद करण्यात येत असल्याचे ग्लोबल रेटिंग कंपनीचे कॉर्पोरेट संचालक नितिन सोनी यांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@