मेस्सीच बेस्ट ; सहाव्यांदा पटकावला ‘बलोन डी'ओर’ पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : फुटबॉल जगातील दिग्गज खेळाडू 'लिओनेल मेस्सी'ने इतिहास रचला आहे. पोर्तुगाल आणि जुव्हेंटसच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँड्सच्या व्हर्जिन व्हॅन डिज्जाकला मागे टाकत मेस्सीने सहाव्यांदा ‘बलोन डी'ओर’चा पुरस्कार जिंकला आहे. तर, अमेरिकेच्या मेगन रेपिनो हिने महिलांमधील हा पुरस्कार पटकावला.

 

रोनाल्डोने २००८, २०१३, २०१४, २०१६ आणि २०१७ या वर्षांमध्ये हा पुरस्कार पाच वेळा जिंकला आहे. तर, मेस्सीने २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५ मध्ये आणि यंदा २०१९चा पुरस्कार पटकावला. लिव्हरपूलच्या व्हर्जिनला युईएफएचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून गौरविण्यात आले आहे. यावर्षी मेस्सीने फिफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारही जिंकला आहे.

 

यंदा, मेस्सीने अजून एका विक्रमाला गवसणी घातली. तो चॅम्पियन्स लीगमधील ३४ वेगवेगळ्या संघांविरुद्ध गोल नोंदवणारा जगातील पहिला खेळाडूही ठरला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी झालेल्या सामन्यात त्याने बोरुसिया डॉर्टमुंडविरुद्ध गोल करून हा पराक्रम केला होता. यंदाच्या फिफा 'बेस्ट प्लेयर ऑफ द इयर' या पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सीसोबत रोनाल्डो आणि नेदरलँडच्या वर्जिल वॅन डिकचाही समावेश होता. मात्र, या स्पर्धेत मेस्सीने बाजी मारत सहाव्यांदा हा पुरस्कार आपल्या खिशात घातला आहे.

@@AUTHORINFO_V1@@