मितालीला मिळाले वाढदिवसाचे 'हे' खास गिफ्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0

 


मुंबई : भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने मंगळवारी ३७वा वाढदिवस साजरा केला. यावेळेस तिला एक खास गिफ्ट मिळाले. तिच्या आयुष्यावर लवकरच बायोपिक तयार करण्यात येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून या बायोपिकची चर्चा होती. मात्र, आता या बायोपिकची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. मितालीच्या ३७ व्या वाढदिवशी या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे.

 
 
 

'शाब्बास मितू', असे तिच्या बायोपिकचे नाव राहणार आहे. या चित्रपटातून मितालीच्या क्रिकेट कारकिर्द पाहायला मिळेल. राहुल ढोलकिया हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 'मिशन मंगल' आणि 'सांड की आंख'च्या यशानंतर तापसी आता या बायोपिकसाठी सज्ज झाली आहे. तिने मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच, तिचा प्रवास पडद्यावर मांडण्यासाठी फार उत्सुक असल्याचेदेखील तिने सांगितले.

 
 
 

"पडद्यावर तुझा प्रवास पाहताना सर्वांना तुझ्याविषयी गर्व वाटेल, असाच मी माझ्या भूमिकेतून प्रयत्न करेल.", असा शब्द तापसीने दिला आहे. मितालीने क्रिकेटमध्ये अमुल्य असे योगदान दिले आहे. ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० वर्षे पूर्ण करणारी मिताली पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरली आहे.

@@AUTHORINFO_V1@@