मेट्रो कामाची प्रगती व प्रकल्प व्यवस्थापन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019   
Total Views |

vichar_1  H x W


उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच, मेट्रो-3च्या मार्गातील आरे कारशेडला स्थगिती दिली. त्यामुळे आपसुकच मेट्रोच्या प्रगतीपथावरील कार्याला खिळ बसू शकते. म्हणूनच, मुंबईतील मेट्रोचे प्रस्तावित जाळे आणि पर्यावरणीय संतुलन कसे राखता येईल, यांचा विचार नवीन सरकारला करावाच लागेल.


जून २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईतील मेट्रो मार्ग
-१च्या (रु. ४,३२१ कोटी अंदाजे किंमत) पायाभरणीचे उद्घाटन केले. हा मेट्रो उन्नत मार्ग वर्सोवा ते घाटकोपर ११.४ किमी लांबीचा ८ जून, २०१४ ला अखेरीस ट्रॅकवर आला. तेव्हापासून आतापर्यंत मुंबईत दररोज चार लाख प्रवासी या मेट्रोसेवेचा लाभ घेत आहेत. या मेट्रो मार्ग-१च्या सेवेचा गेल्या पाच वर्षांत ६० कोटी मुंबईकरांनी लाभ घेतला आहे.



भाजप सरकारची
‘मेट्रो’ धडाका

भाजप सरकारने मेट्रोच्या नियोजनाला २०१४ मध्ये सुरुवात केली व अनेक मेट्रो मार्गांचे जाळे विणण्याचे नियोजन केले. पुढील पाच ते सात वर्षांत ३३७ किमीचे अनेक मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. त्यांची अंदाजे किंमत रु. १ लाख, ५० हजार कोटींच्या घरात आहे. या प्रस्तावित मेट्रो कामाची माहिती खाली संक्षेपाने कोष्टक १ मध्ये दिली आहे.



मेट्रोविषयी महत्त्वाची माहिती

कारशेडकरिता प्रस्ताव - मार्ग २ अ (चारकोप), मार्ग २ ब (मडाले), मार्ग ४ (आवले), मार्ग ५ (कल्याण एपीएमसी), मार्ग ६ (कांजूरमार्ग), मार्ग ७ (दहिसर), मार्ग ३ करिता आरेमध्ये प्रस्ताव होता तो विद्यमान सरकारने अमान्य केला आहे. वृक्ष तोडीकरिता मार्ग ४ करिता न्यायालयाकडून मंजुरी मिळाली आहे. मार्ग २ अ करिता (स्थानकावर १०५ एस्कलेटर), मार्ग ७ करिता (स्थानकावर ८२ एस्कलेटर). उर्वरित ठिकाणी एस्कलेटरकरिता नियोजन सुरू आहे.



मेट्रो डब्यांची निर्मिती


मेट्रो २ अ
, मेट्रो २ ब, मेट्रो ७ व मेट्रो ३ शिवाय काही जास्त अशा ८४ गाड्यांसाठी ‘मेक इन इंडिया’नुसार ५०४ डब्यांच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. हे डबे पुरविण्याचे काम बीईएमएल कंपनीला मिळाले आहे. कंत्राटी किंमत रु. ३०१५ कोटी आहे. सर्व डबे स्टेनलेस स्टीलचे असून त्यांची रुंदी ३.२ मी. असेल. एका डब्यात ३३४ प्रवासी व ६ डब्यांच्या ट्रेनमध्ये २०२२ प्रवासी मावतील. डब्याबाहेर अपंग प्रवाशांकरिता सीसीटीव्ही, व्हीलचेअरसाठी जागा उपलब्ध. नियंत्रण कक्ष व प्रवासी यांच्यामध्ये संवाद शक्य. चालकविरहित, पूर्णपणे स्वयंचलित. संवादावर आधारित नियंत्रण शक्य. प्रवाशांना माहिती पुरविणारी यंत्रणा असणार. सुरक्षित आरामदायी सीसीटीव्हीयुक्त प्रवास, अग्निशमन, धूर व अग्निरोधक यंत्रणा. वातानुकूलित व आर्द्रता नियंत्रण यंत्रणाही कार्यान्वित असेल. मेट्रो ७, मेट्रो २ अ व २ ब यांचे ७० टक्क्यांहून जास्त बांधकाम पूर्ण झाले आहे व मेट्रो-३च्या ५५ किमी भुयारीकरणापैकी ३८.२५ किमीचे (७० टक्के) भुयारीकरण पूर्ण झाले आहे.



मेट्रो
-३च्या स्थानकावरून मंत्रालय, सिद्धीविनायक व इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर (३० कार्यालये, १२ शैक्षणिक संस्था, ११ रुग्णालये, १० मोठे परिवहन हब आणि २५ धार्मिक व करमणुकीच्या संस्था इत्यादी) पोहोचण्याकरिता थेट मार्गिका बांधणार. मेट्रो-३च्या रुळांकरिता कंपने व ध्वनीचा प्रभाव जाणवू नये म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साधने वापरणार. मेट्रोच्या स्थानकांच्या रचनेकरिता (वशीळसप) १२ इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट कॉलेजमधील २३८ विद्यार्थ्यांकडून मदत घेणार. एमएमआरडीएकडे एक तरंगते नियोजन आहे. ३३७ मीटर लांब मेट्रो, एमटीएचएल आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय कामे सांभाळणार्‍या संस्थेने आता रोपवे प्रकल्पाचे नियोजन करण्याचा प्रस्ताव आणला आहे. एक रोपवे प्रकल्प चारकोप मेट्रो स्थानकावरून मालाड मार्वे रस्त्याकरिता व दुसरा महावीर नगर (बोरिवली) मेट्रो स्थानकावरून पॅगोडा व गोराई गावाकरिता असेल.



vichar_1  H x W


मेट्रोकरिता इतर तजवीज


मेट्रो कामाचे नियंत्रण करण्याकरिता मेट्रोभवनचे
(३२ माळ्यांची) काम आरेमध्ये सुरू झाले होते. त्यावर नवीन सरकारने स्थगिती आणली आहे. सर्व मेट्रो मार्ग या मेट्रोभवनामुळे नियंत्रित करणे एका छताखाली येऊ शकेल. मेट्रोसाठी महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना करावी लागणार आहे. हे मंडळ स्वायत्त पद्धतीने काम करेल. मेट्रो गाड्यांचे संचालन, स्थानकांचे व्यवस्थापन, भाडे ग्राहकसेवा, सुरक्षा व्यवस्थापन, आर्थिक कामाचे व्यवस्थापन, गाड्यांचा ताफा, सिग्नल यंत्रणा, टेलिकॉम यंत्रणा, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे, सर्व यंत्रणांचे हायब्रिड ऑपरेशन अ‍ॅन्ड मेंटेनन्स पद्धतीने काम होईल. दिल्ली, बंगळुरू, जयपूर, कोची, लखनऊ, चेन्नई व हैदराबादला तशी हायब्रिड व्यवस्था आहे.


उन्नत मेट्रोच्या खाली बायसिकल ट्रॅककरिता खड्डेविरहित रस्ते गरजेचे असून त्याकरिता स्थानकाजवळ नियोजन करणे तितकेच महत्त्वाचे आहे
. त्याकरिता पालिका आयुक्तांनी योग्य ते आदेश दिले आहेत. राज्य सरकारने त्याकरिता रु १.१६ लाख कोटींची तजवीज केली आहे. स्थानकांच्या ५०० मी. परिघात बहुविध वाहतूक परिवहन प्रकल्पही राबविण्यात येणार आहे. मुंबई तसेच परिसरात १४ ते १५ मेट्रो-मोनो कामे सुरू होणार म्हणून १५ हजार नवे रोजगार तयार होतील. व्यवस्थापन, देखभाल-दुरुस्ती, तिकीट खिडकीकरिता सुरक्षारक्षक इत्यादी कामांकरिता मनुष्यबळ लागणार असून कर्मचारी भरतीही मोठ्या प्रमाणात होईल. आवारात सुविधांचे जाळे करून वाहनतळ, बसथांब्यासह सायकल मार्गिकाही प्रस्तावित आहेत. त्यासाठी वीजपुरवठा व पाणीपुरवठा, वाहिन्या, तारा, पाईप व इतर प्लंबिंग यंत्रणेची व्यवस्था करावी लागेल. एमएमआरडीए नोकरवर्ग व अधिकार्‍यांसाठी प्रशिक्षण देणार असून प्रशिक्षणार्थींना सिंगापूरला पाठविले जाईल.



पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये म्हणून दोन विचारधारा


एक विचारधारा म्हणजे वृक्ष तोडू नये
. कारण, संजय गांधी-आरे कॉलनी हे मुंबईचे फुफ्फुस मानले जाते. दुसरी विचारधारा म्हणते, मेट्रो सुरू झाल्यानंतर गाड्यांचा वापर कमी होईल. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण येईल, तसेच हवेतील विषारी उत्सर्जनावर मर्यादा येतील. म्हणूनच आपल्याला सुवर्णमध्य शोधून काढायला हवा. सुरक्षित प्रवास, शाश्वत विकास हीच मेट्रोची हमी असते. पर्यावरणाचे १०० टक्के रक्षण होणार असून मेट्रोमुळे प्रदूषणमुक्ती मिळणार आहे. तसेच वेळ, पैसे आणि श्रम वाचणार असून आयुष्य सुखसमृद्धीने जगता येणार आहे. शाश्वत विकासाकरिता मेट्रो बांधणे आवश्यक आहे, असे ठाम प्रतिपादन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी एका भाषणातही केले होते. तेव्हा, आगामी काळात राजकीय सूडबुद्धीने विचार न करता, मुंबईकरांच्या हिताचे मेट्रो प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@