पेजावर मठाचे मठाधिपती विश्वेश तीर्थ स्वामी यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2019
Total Views |


pejavar_1  H x



उडुपी : येथील पेजावर मठाचे मठाधिपती विश्वेश तीर्थ स्वामी यांचे रविवारी वयाच्या ८८व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. रविवारी सकाळी उडुपी येथील श्रीकृष्ण मठातच स्वामींनी सकाळी साडेनऊ वाजता अखेरचा श्वास घेतल्याचे उडुपीचे आमदार रघुपती भट यांनी सांगितले. विश्वेश स्वामी यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदींनी यावेळी ट्विटमध्ये म्हटले की, ‘पेजावर मठाचे विश्वेश तीर्थ स्वामी हे प्रेरणास्त्रोताच्या रूपात लाखो नागरिकांच्या हृदयात राहतील. ते धार्मिक सेवेच्या एका ऊर्जास्त्रोतासारखे आहेत. त्यांनी सतत समाजासाठी काम केले. मी अनेक वेळा त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. मी गुरू पौर्णिमेनिमित्त त्यांची भेट घेतली होती. त्यांचे अद्भुत ज्ञान नेहमीच माझ्यासोबत राहिलेले आहे.







त्यांच्या अनुयायांसोबत माझ्या संवेदना आहेत
”,असे मोदी यांनी यावेळी म्हटले. स्वामी यांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यासाठी त्यांच्या अनेक अनुयायांनी मठात यावेळी मोठी गर्दी केली होती. प्रकृती बिघडल्यामुळे विश्वेश तीर्थ स्वामी यांना २० डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लाईफ सपोर्ट सिस्टिमवर असूनही त्यांनी रुग्णालयामधून आश्रमात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर त्यांच्या इच्छेनुसार स्वामींना मठात आणण्यात आले. अखेर रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. विश्वेश स्वामीजी मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे गुरू होते. त्यामुळे उमा भारती आठवड्यापासून उडुपीत आहेत. त्यांनी १९९२ मध्ये स्वामीजींकडून संन्यासाची दीक्षा घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील २०१४ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर स्वामींना भेटण्यासाठी गेले होते. पेजावर मठ उडुपीच्या ‘अष्ट’मठांपैकी एक असून संपूर्ण विश्वभरात त्याची ख्याती आहे.

@@AUTHORINFO_V1@@