उद्ममशीलता आणि विनयशीलतेचा 'महेश'संगम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2019   
Total Views |


saf_1  H x W: 0

 


उल्हासनगरचे नामवंत उद्योजक अशी महेशभाई (खैरारी) अग्रवाल यांची ख्याती. 'रिजन्सी ग्रुप'च्या नावे संपूर्ण महाराष्ट्रात गृहसंकुलांची शृंखला त्यांनी उभारली आहे. रिजन्सी समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची ख्याती जितकी दूरवर परसलेली, तितकेच त्यांच्या विनम्रतेचे आणि साधेपणाचे किस्से सांगितले जातात. त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.


१९७७ साली राजस्थानहून वयाच्या अठराव्या वर्षी मुंबई गाठणारा एक तरुण आज एक प्रतिष्ठित व्यावसायिक म्हणून सुपरिचित आहे. हा प्रवास शक्य झाला तो केवळ त्याच्या मेहनतीमुळे आणि कामावरील निष्ठेमुळेच. यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केल्यानंतरही पाय जमिनीवर कसे असावे, याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महेशभाई अग्रवाल. मुंबईला आल्यावर महेशभाई यांनी व्यवसाय करायचे ठरवले. सुरुवातीला लाकडाचा व्यवसाय करण्याचे त्यांनी निश्चितही केले होते. लाकडाची घाऊक विक्री करून त्याद्वारे स्थिरस्थावर होण्याचे त्यांचे प्रयत्नही सुरू होते. मनाप्रमाणे या व्यवसायात त्यांचा जम बसू लागला. हळूहळू व्यवसायात ते चांगलेच रुळत होते. व्यवसायात नफाही भरारी घेत होता. म्हणूनच मग व्यवसायातील गुंतवणुकीला एक दिशा देण्यासाठी प्लायवूडची फॅक्टरी त्यांनी सुरू केली. कारण, केवळ खरेदीविक्रीपेक्षा उत्पादक म्हणून काम करण्याचे त्यांनी ठरवले होते. हळूहळू रासायनिक उद्योगातील संधी त्यांना खुणावत होती. त्यानंतर महेशभाई अग्रवाल यांनी केमिकलची फॅक्टरी सुरू केली. त्या व्यवसायातही आपला जम बसवला. या व्यवसायातून मिळणारा नफा इतर ठिकाणी गुंतवणूक करत उद्योगाचा आणखीन पसारा वाढवला. यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या तसेच मुंबईनजीकच्या विविध महापालिका क्षेत्रात रस्ते बांधकामाची निविदा भरली. या व्यवसायातही ते अगदी सहजरित्या स्थिरावले. त्या काळात महापालिका क्षेत्रातील ऑक्ट्रॉय वसुली खाजगी संस्थांना देण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळेस महेशभाई यांनी या क्षेत्रात 'कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर'च्या नावे ऑक्ट्रॉय वसुली व्यवसायात पदार्पण केले. ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्व महानगरपालिकांचे ऑक्ट्रॉय वसुलीचे काम महेशभाईंना मिळाले. ऑक्ट्रॉय वसुलीचा त्यांचा अनुभव व त्यांची क्षमता पाहून महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना टोलवसुलीची निविदाही मिळाली. व्यवसायात विविध टप्प्यांत यश मिळत होते. मात्र, महेशभाई खऱ्या अर्थाने 'उद्योजक' म्हणून नावारूपाला आले ते बांधकाम व्यावसायिक म्हणून.

 

२००१ पासून महेशभाई अग्रवाल यांनी गृहनिर्माण क्षेत्रात प्रवेश केला. सध्या नावारूपाला आलेल्या 'रिजन्सी ग्रुप' ची स्थापना त्यांनी केली. या कंपनीद्वारे पुणे, ठाणे, खारघर आणि डोंबिवलीत मोठे व आकर्षक गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. सध्या रिजन्सी ग्रुपची पुणे, लोणावळा, खारघर, ठाणे, डोंबिवली या परिसरात सुमारे दोन कोटी चौरस फूट इतकी गृहनिर्माणाची कामे प्रगतिपथावर आहेत. राजस्थानच्या उदयपूर शहराजवळील एका खेड्यातून आलेला एक अठरा वर्षांचा तरुण वयाची साठी ओलांडण्यापूर्वीच अत्यंत मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने अनेक व्यवसायांत आघाडी मिळवतो, हे खरोखरच अनुकरणीय आणि वाखाणण्याजोगे आहे. मात्र, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आजही विनम्र आणि अतिशय साधी राहणी यामुळे आपल्या मित्रपरिवारामध्ये ते अधिक लोकप्रिय आहेत. महेशभाईंच्या या संपूर्ण प्रवासात त्यांना कल्याण जनता सहकारी बँकेची मोलाची साथ लाभली. "२६ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ साली कल्याण जनता सहकारी बँकेने, आपल्याला पहिले कर्ज दिले होते. तेव्हापासूनच आजतागायत कल्याण जनता सहकारी बँक कायम आपल्या पाठीशी उभी राहिली आहे," असे ते आवर्जून इतरांना सांगतात. आपल्या यशातील मोलाचा वाटा हा बँक आणि त्यावेळच्या संचालकांचा आहे, हे सांगायला ते विसरत नाहीत. ठाणे जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांचे महेशभाई आश्रयदाते आहेत. स्वतःचे नाव कुठेही प्रसिद्धीस येऊ न देता, कुठलाही गाजावाजा, बडेजाव न करता मदत करीत राहाणे, हे सांगणारी आपली संस्कृती. त्यामुळे ती आपणच जोपासायला हवी, यावर महेशभाईंचा अगदी ठाम विश्वास आहे.

 

महेशभाईंकडे मदतीसाठी आलेली व्यक्ती किंवा संस्था

 

कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही, असे त्यांच्या बाबतीत त्यांचे आप्तस्वकीय नेहमीच सांगतात. महेशभाईंच्या यशाचा आलेख हा असाच सदैव उंचावत राहावा आणि त्यांचे समाजकार्य उत्तरोत्तर वाढत जावे, हीच सदिच्छा!

@@AUTHORINFO_V1@@