इमरानची वैचारिक कोंडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2019   
Total Views |


imran khan_1  H



स्वबळावर स्वतःच्या समस्या दूर करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय समुदायाला तुम्ही आमची रदबदली करा, असे आवाहन राष्ट्रप्रमुखाने करणे हे निश्चितच खेदजनक आहे. पाकमध्ये नागरिकांच्या समस्या या सोडविण्याची ताकद सरकारमध्ये नाही, हेच याचे द्योतक आहे काय? असा प्रश्न इमरान यांच्या भूमिकेमुळे आता निर्माण झाला आहे.



आपल्याकडे एखाद्या विषयावर समर्पक भाष्य करण्यासाठी मुद्दा नसला किंवा आपण एखादे विधायक काम करू शकत नसलो की
, लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आणि स्वतः सुरक्षित राहायचे, असे धोरण अडचणीत सापडलेला किंवा वैचारिक गोंधळ उडून कोंडीत सापडलेला राज्यकर्ता करत असतो. हेच काम मागील काही दिवसांत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केले आहे. मागील काही दिवसांत त्यांनी दोन विधाने केली. पाकिस्तानमधील झेलम जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना इमरान म्हणाले की, “नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भारतात उडालेला गोंधळ आणि अशांतता यावरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये एखादी कार्यवाही करू शकतो.”



तसेच मागील शनिवारी इमरान खान यांनी
‘एपीएनपीए’च्या सदस्यांना (अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ पाकिस्तानी डिसेंट ऑफ नॉर्थ अमेरिका) अमेरिकेतील भारतीय लॉबीला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दुप्पट गती करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी काश्मीर आणि भारतातील पीडित मुस्लिमांसाठी आवाज उठवा, असे आवाहन केले. पेशावर येथे आयोजित मेडिकल असोसिएशनच्या हिवाळ्याच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “एपीएनपीए हा विदेशातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी गट आहे. आपण सर्वात जागरूक व सर्वात शिक्षित आहात.” यावेळी इमरान खान यांनी,“सध्या अमेरिकेतील भारताची लॉबी पाकिस्तानपेक्षा बरीच सामर्थ्यशाली आहे. भारताच्या दृष्टिकोनातून नेहमीच पाकिस्तान कमी पडतो आणि पाकिस्तानबद्दलच्या अमेरिकन धोरणांचा त्या दृष्टिकोनातून परिणाम होतो,” याची जाहीर कबुलीदेखील दिली.



भारत सध्या काश्मीरमध्ये आणि मुस्लिमांशी भारतामध्ये जे काही करत आहे
, ते सर्व मानवतावादी कायद्यांचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणारे असल्याचे इमरान यावेळी म्हणाले. भारताचे सध्याचे धोरण हे नाझीवादी असल्याची दर्पोक्तीदेखील इमरानने यावेळी मांडली. याच वेळी पाकिस्तानमधील आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘डॉन’ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील प्रॅक्टिशनर आणि ई-गव्हर्नन्सवरील संशोधक शाहीद फारूख यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात फारूख यांनी, “२००दशलक्षाहून अधिक रहिवाशांसह पाकिस्तान एका चौरस्त्यावर उभे असून दहशतवादाच्या विनाशकारी लाटेतून सावरून ते आता लोकशाही सरकारमध्ये मार्गक्रमण करत आहे. निवडणुकीवेळी इमरान खान यांनी पाकिस्तानी जनतेला दिलेली, सुशासन, शहरी सोयीसुविधा-म्हणजे वीज, पाणी, सांडपाणी आणि गतिशीलता यासारख्या सेवांचा दर्जा आणि सामाजिक आणि पर्यावरणीय आरोग्य देण्याची हमी दिली होती.



पाकिस्तानमधील नागरिकांना कित्येक दशकांपासून या अतुलनीय अपेक्षा आहेत
” आणि काळाच्या ओघात ही समस्या अधिकच बिकट होत चालली असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये आज वाहतूककोंडी आणि वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात असून जलद शहरीकरणामुळे कमी शहरी वस्ती निर्माण झाली आहे, ज्यामुळे अभूतपूर्व आर्थिक, स्थानिक, सामाजिक आणि पायाभूत आव्हानांचा सामना करावा पाकिस्तानला करावा लागत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये ‘स्मार्ट विकास’ आणि ‘स्मार्ट शहरे’ यांची गरजदेखील त्यांनी आपल्या लेखात मांडली आहे. फारूख यांनी इमरान खान सरकारचे लक्ष या समस्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही इमरान खान यांना पाकमधील समस्यांपेक्षा अमेरिका पाकच्या बाजूने उभी कशी राहील? नागरिकत्व सुधारणा कायद्याने भारताचे भविष्य काय असेल, याचीच चिंता भेडसावत आहे. अशा स्थितीत इमरान यांना नेमकी काय भूमिका घ्यावी हेच कळत नाही. त्यामुळे त्यांची एकप्रकारे वैचारिक कोंडी झाली आहे काय, असा प्रश्न समोर येत आहे. स्वबळावर स्वतःच्या समस्या दूर करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय समुदायाला तुम्ही आमची रदबदली करा, असे आवाहन राष्ट्रप्रमुखाने करणे हे निश्चितच खेदजनक आहे. पाकमध्ये नागरिकांच्या समस्या या सोडविण्याची ताकद सरकारमध्ये नाही, हेच याचे द्योतक आहे काय? असा प्रश्न इमरान यांच्या भूमिकेमुळे आता निर्माण झाला आहे.

@@AUTHORINFO_V1@@