‘सिंध’ ते ‘मराठा सेक्शन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2019
Total Views |


society_1  H x



१९४७साली जेव्हा देशाची फाळणी झाली
, तेव्हा सिंध व कराची (आताच्या पाकिस्तानचा भूभाग) आणि बंगाल (आताचा बांगलादेश) इथून लाखोंच्या संख्येने सिंधी, शीख, बंगाली व इतर हिंदू बांधवांनी आपला जीव वाचवण्यासाठी भारताच्या दिशेने धाव घेतली. धार्मिक उत्पीडन, व बलात्कार अत्याचार यांसारख्या घटनांपासून वाचण्यासाठी त्यांनी आपले घरदार, पैसा-अडका, व्यवसाय-धंदा सर्व गमावले.



आपण आजपर्यंत फाळणीच्या अनेक भीषण कथा ऐकत आलो आहोत
. फाळणीचा इतिहास चाळला तर डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या रक्तलांच्छित, प्रेताच्या ढिगांनी भरलेल्या रेल्वे गाड्या, सैरभैर झालेले, कफल्लक होऊन आलेले, अनेक अन्याय-अत्याचार भोगून जीव मुठीत घेऊन आलेले निर्वासितांचे तांडे. आपले सर्वस्व गमावलेले, आपल्या आप्तस्वकीयांनाही मुकलेले, घाबरलेले, भेदरलेले चेहरे डोळ्यांसमोर आले की, अंगावर अक्षरशः काटा उभा राहिल्या शिवाय राहत नाही. १९४७साली जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा सिंध व कराची (आताच्या पाकिस्तानचा भूभाग) आणि बंगाल (आताचा बांगलादेश) इथून लाखोंच्या संख्येने सिंधी, शीख, बंगाली व इतर हिंदू बांधवांनी आपला जीव वाचवण्यासाठी भारताच्या दिशेने धाव घेतली. धार्मिक उत्पीडन, व बलात्कार अत्याचार यांसारख्या घटनांपासून वाचण्यासाठी त्यांनी आपले घरदार, पैसा-अडका, व्यवसाय-धंदा सर्व गमावले.



भारताच्या अनेक भागात या सर्वांना सामावून घेण्यात आले
. निर्वासितांच्या छावण्यांमधून त्यांची त्यावेळी ब्रिटिश मिलिटरीनी मोकळ्या केलेल्या कॅम्पमधील बराकींमध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तेथून परत जगण्यासाठी संघर्षाला सुरुवात झाला. अक्षरश: शून्यातून पुन्हा सुरुवात. पण हतबल न होता ते सर्व ही लढाईही देशप्रेमापोटी विनातक्रार लढले. एवढ्या कमी कालावधीत ज्या वेगाने या सर्वांनी आपले पुनर्वसन केले, जे त्यांनी स्वतःला सावरले ते कौतुकास्पद आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी पुन्हा झेप घेतली. सिंधी समाजाने तर या परिस्थितीवर मात करून त्यांची केलेली प्रगती तर वाखाणण्याजोगी आहे, प्रेरणादायी आहे. या सर्व समाजाने एकमेकाला आधार देऊन सर्वांना या संकटातून बाहेर काढले.



परंतु फाळणीच्या काही ‘
Untold stories’ (अव्यक्त) आहेत, ज्या फार निवडक लोकांनाच माहीत आहेत. नवीन पिढीला तर या सर्वाची कल्पनाच नाही. आपल्यालाही फार थोड्या लोकांना हे माहीत असावे की, फाळणी झाली तेव्हा अनेक मराठी बांधव सिंध व कराची येथे राहत होते व त्यांनीसुद्धा त्या बिघडलेल्या वातावरणामुळे भारताकडे धाव घेतली. त्यात बहुतांश लोक कोकणी, मालवणी व गोव्याकडील राहणारे होते व व्यवसाय-धंद्यामुळे हे सर्व कराचीत स्थायिक झाले होते. परंतु, फाळणीनंतरच्या धार्मिक छळाला कंटाळून त्यांनी सिंध व कराची येथून आपली सुटका करून घेतली. महाराष्ट्रात मराठी निर्वासित परिवारांना ब्रिटिश मिलिटरीने रिकाम्या केलेल्या बरॅक्स राहण्यासाठी देण्यात आल्या. कुर्ला, मुलुंड, चेंबूर, पुणे व उल्हासनगर यांसारख्या ठिकाणी या सर्वांचे पुनर्वसन करण्यात आले.

“मी कराचीला तिसरीपर्यंत शिकलो. आम्ही ज्या ठिकाणी राहायचो त्याला ‘बोहरी बाजार’ म्हणायचे. मागच्या गल्लीत हिंदूंची विशेषतः मराठी सोनारांची दुकाने होती. फाळणी झाल्यानंतर हिंदू लोकांना मारधाड, धरपकड सुरू झाली, दंगे होऊ लागले. हिंदू लोकांना सतवायाचे, त्यांना लुटायचे. त्यामुळे तिथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्या लोकांनी तेथील अनेकांची दुकाने फोडली, लुटली. त्यामुळे तेथील जिणे कठीण होऊन बसले. आम्ही सर्व वडिलांच्या एका ख्रिश्चन मित्राच्या मदतीने कराची बंदरातून ‘अकबर’ नावाच्या बोटीने वरळी (मुंबई) इथे आलो. मग तेथून आम्हाला उल्हासनगरमधील मिलिटरीच्या रिकाम्या बरॅकमध्ये राहण्यासाठी जागा देण्यात आल्या,” असा धक्कादायक किस्सा ८१ वर्षीय, उल्हासनगरमधील स्थायिक जगन्नाथ भिकाजी चोडणकर यांनी सांगितला.

त्यांच्या परिवाराने त्यानंतर खूप हलाखीचे दिवस काढले. परंतु, मेहनत करून आज त्यांचा परिवार उल्हासनगरमध्ये यशस्वीरीत्या सोनाराचा व्यवसाय करीत आहे. त्यांच्यासारखी अनेक कुटुंबे ‘मराठा सेक्शन’मध्ये राहत आहेत. त्यांना पूर्वी ‘सिंध महाराष्ट्रीयन निर्वासित समाज’ असे म्हटले जायचे. आज त्यांना ‘सिंध महाराष्ट्रीयन समाज’ असे म्हणतात. या समाजांर्तगत ‘उल्हास विद्यालय’ ही शाळा चालविण्यात येते. या शाळेत बहुतांश निर्वासित परिवारातील मुलांनी शिक्षण घेता आले. फाळणीमुळे उद्भवलेल्या संकटांना न घाबरता, न डगमगता या सर्वांनी सामना केला व जिद्दीने क्षिक्षण घेऊन, मिळेल ते काम करून आज हा समाज स्वतःच्या पायावर उभा आहे. उल्हासनगर येथील ‘मराठा सेक्शन’मधील प्रत्येक घराघरातून अशा प्रेरणादायी कथा आपल्याला ऐकायला मिळतील. सिंध-कराचीत फाळणी पूर्वी जन्माला आलेल्यांचे आजही असे म्हणणे आहे की, आम्ही अखंड हिंदुस्तानात जन्माला आलेलो आहोत. पाकिस्ताननंतर निर्माण झाले. याचाच अर्थ आम्ही मूळ भारतीय हिंदुस्तानी आहोत.

- पायल कबरे

@@AUTHORINFO_V1@@