‘सिम्बा’च्या वर्षपूर्तीचे अनोखे सेलिब्रेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2019
Total Views |

simba_1  H x W:



रणवीर सिंग आणि सारा अली खान अभिनित ‘सिम्बा’ या चित्रपटाला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना दाखवली. ‘आ राही है पोलीस’ असं म्हणत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये अक्षय कुमार सह रणवीर सिंग आणि अजय देवगणही झळकले आहेत.





‘सिम्बा’च्या वर्षपूर्ती निमित्ताने हा खास टीझर प्रदर्शित करण्यात आला. यात सिंघम, सिम्बा आणि सूर्यवंशी अशा तीनही लोकप्रिय पोलीस पात्रांना पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ या चित्रपटात शेवटी ‘सिंघम’ म्हणजेच अजय देवगण दिसला होता. तेव्हा आता या आगामी ‘सूर्यवंशी’मध्ये ‘सिंघम’ अजयसह, ‘सिम्बा’ रणवीरही दिसणार का प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. येत्या वर्षी २७ मार्चला हा चित्रपट होणार आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@