मेरी कॉमच बॉक्सिंगची राणी ; निखतवर केली मात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2019
Total Views |


df_1  H x W: 0

 

नवी दिल्ली : सहा वेळा जागतिक विजेती एम. सी. मेरी कोम आणि माजी कनिष्ठ विश्वविजेती निखत झरीन यांच्यातील बहुचर्चित बॉक्सिंग लढत शनिवारी पार पडला. यामध्ये विश्वविजेती बॉक्सर मेरी कोमने या सामन्यात निखत झरीनचा ९-१ ने पराभव केला. मेरी या विजयासह आता ५१ किलो गटातून भारताकडून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा खेळणार आहे.

 

पुढील वर्षी चीनमध्ये ३ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दरम्यान, ऑलिंम्पिक पात्रता स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत. मेरी या पात्रता स्पर्धेत ५१ किलो गटात भारताचे नेतृत्व करेल. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या ट्रायल सामन्यात ५१ किलो वजनी गटात निखत झरीनने ज्योती गुलियाला १०-० अशी मात देत तर मेरी कोमने रितू ग्रेवालचा १०-० ने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

@@AUTHORINFO_V1@@