व्यंगचित्रांचा ‘विकास’ विसावला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2019
Total Views |



vikas sabnis_1  


अगदी जड अंतःकरणाने...! चित्रकला क्षेत्रातील आणि सर जे जे स्कूलचे ‘आयकॉन’ ठरलेले, ज्यांनी व्यंगचित्र कलेच्या एका खास अंगाचा विकास घडवून आणला, ते ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस फक्त ६९व्या वर्षीच समाजकारण आणि राजकारण या दोन घटकांना कायमचे सोडून गेले. चुटपुट लावून गेले. हे मानायला मन धजत नाही.


व्यंगचित्र रेखाटणं म्हणजे मनात असलेला ठाम विश्वास, हातात असलेला कुंचल्याचा फटकारा आणि समाजात घडत असलेल्या दैनंदिनीतील निरीक्षणे यांचं चपखलपणे, मिश्किलपणे, खुसखुशीत तरीही राग न येऊ देणारं शैलीदार रेखांकन...! या रेखांकनाला जर प्रतिभाशक्तीची जोड लाभली आणि सूक्ष्म अभ्यासपूर्ण अचूकता लाभली तर ते रेखांकन चिरंजीव ठरतं, अजरामर ठरतं ! अशा रेखांकनात समाजातील विशेषतः राजकीय परिस्थितींवर दोष वा गैरबाबी समर्थपणे मांडण्याचे धाडस करणारा कुंचला या जगाचा निरोप घेऊन गेला.विश्वास बसत नाही. मात्र, मृत्यू हेच जीवनातील कटुसत्य असतं, ते स्वीकारावंच लागतं. अगदी जड अंतःकरणाने...! चित्रकला क्षेत्रातील आणि सर जे जे स्कूलचे ‘आयकॉन’ ठरलेले, ज्यांनी व्यंगचित्र कलेच्या एका खास अंगाचा विकास घडवून आणला, ते ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस फक्त ६९व्या वर्षीच समाजकारण आणि राजकारण या दोन घटकांना कायमचे सोडून गेले. चुटपुट लावून गेले. हे मानायला मन धजत नाही.



जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सबनीस यांच्या रेषांमधील गतिमानता आणि ज्वलंत सामाजिक
-राजकीय परिस्थितीवरील रेषात्मक भाष्य चित्रबद्ध करण्याचे कसब ध्यानी घेऊन ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रांची जबाबदारी सोपविली होती. तेथे सबनीसांच्या व्यंगचित्रांना एका अर्थाने राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले. ‘राजकीय व्यंगचित्रकार’ अशी त्यांना ओळख प्राप्त झाली.आणखी काही नियतकालिकांमध्येही त्यांच्या व्यंगचित्रांनी हजारो शब्दांची ताकद प्राप्त केली होती. पद्मविभूषण व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनाही त्यांनी बाळासाहेबांप्रमाणेच गुरुस्थानी मानलं होतं. परंतु, या दोनही दिग्गज व्यंगचित्रकारांची शैली आणि विकास सबनीस यांची शैली ‘ओव्हलॅप’ झालेली दिसली नाही. ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त होते.



आम्ही तसे जवळच रहायचो
. नवी मुंबईला ‘आर्टिस्ट व्हिलेज’ येथे त्यांचा बंगला आहे.रस्त्याने प्रचलित उंचीच्या लोकांहून रामकाठी बाभळीसारखे सडसडीत व्यक्तिमत्त्व रस्त्याने लांबच लांब पावले टाकत चालताना दिसले की, कळून जायचे की विकास सर आहेत. मग भेट व्हायची. गप्पा व्हायच्या. मी जेजेत असल्यामुळे अर्थातच कला विद्यार्थ्यांच्या कलेतील स्केचिंगसह सरावातील कमतरता यावर ते हमखास खंत व्यक्त करायचे. दीड-दोन महिन्यांपूर्वी आम्ही भ्रमणध्वनीवर बोललो होतो. त्यांना जेजेत उपयोजित कलेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना रेषांचे आणि व्यंगचित्रांचे महत्त्व प्रात्यक्षिकांसह सांगण्यासाठी ते येतो म्हणाले होते. आता ते येणार नाहीत. मात्र, कलाकार हा त्याच्या कलेद्वारे अजरामरच असतो....! व्यंगचित्रकार विकास सबनीस यांना आमच्या जेजे परिवारासह सर्व कला विद्यार्थ्यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली ....!!



- प्रा. गजानन शेपाळ 
@@AUTHORINFO_V1@@