समाजकल्याणसाठी 'संचालक समाजसेवा पुरस्कार निधी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2019   
Total Views |


asf_1  H x W: 0

 


'दि कल्याण जनता सहकारी बँके'ची दि. २३ डिसेंबर, १९७३ रोजी स्थापना झाली. या बँकेच्या स्थापनेला एक वेगळीच पार्श्वभूमी होती. कल्याण येथील 'पीपल्स् को-ऑपरेटिव्ह बँक' नुकतीच बुडाली होती. त्यामुळे कल्याणकरांचा सहकारी बँकेबाबतचा विश्वास डळमळीत झाला होता. अशा परिस्थितीत काही तरी नवे करून दाखविण्याची ऊर्मी असलेले कल्याणातील काही तरुण ठामपणे उभे राहिले व त्यांनी १८० चौ. फुटांच्या छोट्याशा जागेत ही बँक सुरू केली. लोकांना विश्वास वाटावा म्हणून केवळ प्रामाणिक व नि:स्वार्थी असून भागणार नव्हते, तर तसे लोकापर्यंत पोहोचेल अशा गोष्टी करणे आवश्यक होते. यातूनच संचालक कर्ज घेणार नाहीत, जामीनदार राहणार नाहीत व त्यापेक्षाही महत्त्वाचे असे की, संचालक भत्ते स्वीकारणार नाहीत, असे नियम निश्चित करण्यात आले. खरे म्हणजे, या नियमांतून निहित स्वार्थ बाळगणारे लोक संचालक म्हणून पुढे येणार नाहीत, अशी व्यवस्था स्वाभाविकपणे केली गेली.

 
asff_1  H x W:  
 

सहकारी तत्त्वामध्येच नि:स्वार्थ व प्रामाणिक भाव अनुस्यूत आहे. त्यामुळे वरील नियम म्हणजे काही फार मोठा त्याग वगैरे, असेही नाही. परंतु, त्या वेळेचा कल्याणातील सहकारी बँकेसंबंधीचा लोकांचा अनुभव व दुर्दैवाने आजसुद्धा महाराष्ट्र व एकूणच भारतातील सहकार क्षेत्रातील दूषित वातावरण यांचा विचार करताना हे नियम महत्त्वाचे वाटतात. 'दि कल्याण जनता बँके'च्या संचालकांनी या सभा भत्त्यातून काही चांगले उपक्रम करण्याचे ठरविले. कोणी गरीब, गरजू विद्यार्थी असला की, त्याला शिक्षणासाठी मदत करणे अथवा एखाद्या खेळाडूला देश-विदेशातील विविध स्पर्धांमधून भाग घेण्यास आर्थिक मदत करणे, असे उपक्रम सुरुवातीच्या काळात केले गेले. अर्थात, आजसुद्धा हे उपक्रम सुरु आहेत. नंतर असा विचार करण्यात आला की, विविध क्षेत्रात महनीय कामगिरी करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील व्यक्तींचा अथवा संस्थांचा गौरव करून त्यांना पुरस्कार द्यावा. दि. ८ ऑक्टोबर १९९६ रोजी ही संस्था मा. धर्मादाय आयुक्त, मुंबई यांचे कार्यालयात कायदेशीर नोंदणी होऊन 'संचालक समाजसेवा पुरस्कार निधी' या नावाने उदयास आली. 'संचालक समाजसेवा पुरस्कार निधी'ने आजपर्यंत १२ व्यक्ती व ८ संस्था यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@