कर्जमाफीवरून 'ठाकरे सरकार' ट्रोल ; 'ही तर शेतकऱ्यांची फसवणूक'

    28-Dec-2019
Total Views |


ut_1  H x W: 0



मुंबई : महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ जाहीर केली. या योजनेत शेतकऱ्यांना कोणत्याही निकषांशिवाय सरसकट कर्जमाफी दिली जाईल. मात्र या कर्जमाफी योजनेत व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. तसेच १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम २ लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास २ लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसून दिलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक असल्याची टीका केली आहे. नेटकऱ्यांनी ट्विट करत या सरकारवर टीका केली.





त्याचप्रमाणे अल्पमुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांनी अल्पमुदतीत कर्जफेड केली आहे त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत आपण कर्जफेड करून चूक केली आहे का अशा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे आता जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात ते आता कर्ज थकीत ठेवतील. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्जमाफीवर उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय चुकीचा असून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस उद्धव ठाकरेंची फसवणूक करत आहेत असा आरोप केला होता.