हिंदू म्हणून संघात मिळायची वाईट वागणूक ; दानिश कनेरियाचा गौप्यस्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील नात्यांचा परिणाम हा पाकिस्तानमधील हिंदू नागरिकांसोबतच खेळाडूंवरही तेवढाच झाला. नुकतेच एका मुलाखतीमध्ये भारताचा माजी शोएब अख्तरने गौप्यस्फोट करत हिंदू असल्यामुळे पाकिस्तान संघाचा फिरकीपटु दानिश कनेरिया याला संघातील इतर खेळाडूंकडून वाईट वागणूक दिली जात होती असा धक्कादायक खुलासा केला होता. त्यानंतर आता दानिश कनेरियानेदेखील यावर दुजोरा देत हे सर्व सत्य असून त्याच्यासोबत भेदभाव होत असल्याची भावना व्यक्त केली.

 

दानिश कनेरियाने सांगितले की, "शोएब अख्तरने सत्य सांगितले आहे. मी हिंदू आहे म्हणून माझ्याशी न बोलणाऱ्या सर्व खेळाडूंची नावे मी जाहीर करणार आहे. याआधी या विषयावर बोलण्याची हिंमत माझ्यात नव्हती, पण आता मी ती हिम्मत आली आहे." त्याच्या या वक्तव्यामुळे क्रिकेटवर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. शोएब अख्तरने हि बाब जगाच्या समोर आणल्याने दानिशने त्याचे आभारदेखील मानले आहेत.

 

पाकिस्तानचा फिरकीपटु दानिश कनेरियाने एवढे असूनसुद्धा क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. पाकिस्तानी संघात कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट्स घेण्याच्या यादीत दानिश चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानी क्रिकेट संघात स्थान मिळवणारा दुसरा हिंदू धर्मीय खेळाडू आहे. याआधी अनिल दलपत पाकिस्तानी संघाकडून खेळात होते.

@@AUTHORINFO_V1@@