'त्या' धार्मिक शब्दाच्या उच्चारावर ख्रिस्ती संघटनांचा आक्षेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2019
Total Views |

Farah Khan _1  



   रवीना टंडन, भारती सिंह, फराह खान यांच्याविरोधात पोलीसांत तक्रार


लखनऊ : ख्रिस्ती धर्माशी संबंधित एका शब्दाचा उच्चार चुकीच्या पद्धतीने केल्याप्रकरणी रवीना टंडन, भारती सिंह आणि फराह खान यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. ख्रिस्ती समाज फ्रंट प्रदेश अध्यक्ष सोनू जाफर यांनी अजनाला चौक येथे तिघांविरोधात भारतीय दंड संहिता कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईसाई धर्मात 'हालेलुयाह' या शब्दाचा उच्चार चुकीचा केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान अशाप्रकारे अवमान करण्याचा आमचा कुठला हेतू नव्हता असे ट्विट रविना टंडनने करत या प्रकरणी दिलगीरी व्यक्त केली आहे. 





 

एका खासगी युट्यूब चॅनलतर्फे प्रसारित करण्यात आलेल्या एका व्हीडिओत कॉमेडीअन भारती सिंह, रविना टंडन आणि फरान खान यांनी 'हालेलुयाह' या शब्दाचा उच्चार चुकीचा केला, या शब्दाची थट्टा केली. यावर त्यांनी आक्षेप घेतला. या शब्दाचा अर्थ हा चुकीचा झाला अशी तक्रार सोनू जाफर यांनी अजनाला यांनी पोलीस उपायुक्त सोहन सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांविरोधात तपास सुरू आहे.
 

ख्रिस्ती धर्म संघटनांच्या मागणीनुसार, या प्रकरणी रवीना, भारती आणि फराह खान यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या व्हायरल व्हीडिओत फराह खान निवेदक होती. सोनू जाफर यांनी पोलीसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, या कार्यक्रमात 'हालेलुयाह' हा शब्द इंग्रजीत लिहीण्यास सांगितला होता. त्यानुसार भारती आणि रविनाने हा शब्द इंग्रजीत लिहीला मात्र, ‘Hallelujah' ची स्पेलिंग भारतीने चुकीची लिहीली, त्याचा उच्चारही चुकीचा केला. यावर ख्रिस्ती संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

 

अजनाला पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणी तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुराव्यांची छाननी करण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणी तिघांनाही आपले म्हणणे मांडण्यासाठी लवकरच बोलावण्यात येणार आहे. तसेच पोलीसांनी तिघांनाही अटक करावी, या मागणीसाठी अजनाला पोलीस ठाण्यावर ख्रिस्ती संघटनांचा मोर्चा निघणार आहे.


अग्रलेख - चर्चला किंकाळ्या ऐकू येतील?

@@AUTHORINFO_V1@@