
नवी दिल्ली : 'भारतीय सशस्त्र सेना अत्यंत शिस्तबद्ध आहेत. त्यांना मानवाधिकार कायदा आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याबद्दल उच्च आदर आहे. भारतीय सशस्त्र सेना दलाची नीति मानवता आणि सन्मान आहे. ते धर्मनिरपेक्ष आहेत.'असे वक्तव्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) एका कार्यक्रमात सैन्य प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले.
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. जनरल बिपिन रावत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात झालेल्या आंदोलनावर भाष्य करताना गुरुवारी म्हणाले होते की, "जर नेते शहरांमध्ये विद्यापीठे व लोकांना विद्यार्थ्याना जाळपोळ व हिंसाचारासाठी भडकावतात तर ते नेतृत्व नाही."
सैन्यप्रमुख म्हणाले होते की,"नेते जनतेतून उदयास येतात, गर्दीला “अनुचित दिशेने” नेणारे नेते नसतात. नेते म्हणजेच लोकांना योग्य दिशेने नेतात असे." त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी नेत्यांनी कडाडून टीका केली आणि त्यांच्या वक्तव्याला राजकीय हेतूने प्रेरित केले.