शंभर प्रवासी घेऊन जाणारे विमान इमारतीला धडकले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2019
Total Views |

KAzakistan _3  

 



नूर सुल्तान : कजाखस्तानच्या अल्माती विमानतळाजळ एक मोठा विमान अपघात घडला. विमानाने उड्डा घेताच जवळील इमारतीला धडक दिली.



KAzakistan _4  


अपघातग्रस्त विमानात ९८ जण प्रवास करत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या१५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६० जण जखमी झाले.




या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, बेक एअर फ्लाइट झेड ९२१०० विमान अल्माती शहरातून राजधानीच्या दिशेने जाणार होते. परंतु, शुक्रवारी सकाळी .२२ वाजता टेक-ऑफ करताच विमानावरील ताबा सुटला आणि दुमजली इमारतीवर धडकले.




या भीषण अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल झाल आहे. त्या ढिगाराखाली आठ चिमुकल्यांना बाहेर काढताना आणि एक महिला मदतीसाठी रुग्णवाहिकेची मागणी करताना दिसआहे.


KAzakistan _2  


हे सगळेच विमान आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले होते. विदेशी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अपघात घडला त्यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके असल्याने दृश्यता सुद्धा कमी होती. अपघाताच्या कारणांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.





कझाखस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासम झोमार्ट यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. या प्रकरणी तपासाचे निर्देश देत एक समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.


KAzakistan _1  


या प्रकरणी दोषी आढळलेल्यांवर कारवाई करू, असेही ते म्हणाले.
कझखस्तानच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सहा मुलांचाही देखील समावेश आहे.

@@AUTHORINFO_V1@@