राहुल गांधी म्हणजे दिल्लीतलं शेंबडं पोरं : शरद पोंक्षे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2019
Total Views |

sharad_1  H x W



पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी काही मुलं गतिमंद असतात अशा शब्दांत टीका केली आहे. भाजपकडून पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आम्ही सर्व सावरकर’ या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांचे ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


यावेळी बोलताना शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींचा ‘दिल्लीमधील शेंबडा मुलगा असा उल्लेख केला. मला तर त्यांचे आभार मानायचे आहेत. मी त्यांच्यावर चिडत नाही. काही मुलं गतिमंद असतात. उलट मी त्यांचे आभार मानतो,” असा उपहासात्मक टोलाही शरद पोंक्षे यांनी लगावला आहे.


“मी त्यांना विनंती करतो की, सतत दीड दोन महिन्यांनी त्यांनी असंच विधान करत राहावं. त्याच्यामुळे काय होतं, हिंदू धर्मियांना एक रोग आहे पटकन थंड होण्याचा. आपण पेटतही लवकर नाही आणि पेटलो तर लवकर थंड होतो. आपल्यातला शिवाजी, सावरकर लवकर जागाच होत नाही. मग अशी माणसं उपयोगी पडतात. ते तिकडं वेड्यासारखा बोलले की सगळ्यांच्या मनातील सावरकर, शिवाजी, राणा प्रताप, टिळक हे जागे होतात. मग आपण धडाधड त्यांच्याबद्दल शोधाशोध करण्यास सुरुवात करतो. काही मिळतंय का.. असं म्हणत व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होण्यास सुरुवात होते. त्यात माझीही अनेक भाषणं अनेक ठिकाणी फिरतात. मग माझ्यातही सावरकरांबद्दल जागृती होते, ही किती चांगली गोष्ट आहे”. असेही ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@